शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळण्याची आशा नको - परराष्ट्रमंत्री महेमूद कुरेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 03:45 IST

जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही.

इस्लामाबाद : जम्मू आणी काश्मीरला विशेष दर्जा दिलेले कलम ३७० भारताने रद्द केल्याच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा, तसेच मुस्लिम जगाचा पाठिंबा मिळवणे हे सोपे नाही. त्यामुळे ‘मूर्खांच्या नंदनवनात’ राहू नये, असा सल्ला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या देशवासीयांना दिला आहे.पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादेत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानी नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ‘नव्या प्रकारचा संघर्ष’ सुरू करावा, असे म्हटले. ‘तुम्ही लोक मूर्खांच्या नंदनवनात जगू नका. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कोणीही हार घेऊन स्वागताला उभे राहणार नाही. कोणीही तुमची तेथे वाट बघणार नाही,’ असे कुरेशी म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आम्ही त्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दाद मागू, असे जाहीर केले होते. कलम ३७० घटनेतून रद्द करण्याचा निर्णय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगून पाकिस्तानने ‘वस्तुस्थिती’ स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे.कुरेशी यांनी कोणत्याही मुस्लिम देशाचे नाव न घेता सांगितले की, ‘मुस्लिम समुदायाचे पालकदेखील (गार्डियन्स आॅफ उम्माह) त्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने उभे ठाकणार नाहीत. जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे हितसंबंध असतात. एक अब्जाच्या वर लोकसंख्येचा भारत हा एक मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोकांनी तेथे गुंतवणूक केलेली आहे. आम्ही नेहमीच उम्माह आणि इस्लामबद्दल बोलतो; परंतु मुस्लिम समुदायाच्या पालकांनीदेखील भारतात गुंतवणूक केलेली असून, त्यांचे स्वत:चे हित तेथे आहे.’

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर