शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

अमेरिकेतून कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी व्हिसा गरजेचा असतो का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 10:00 IST

लेओव्हर 2-3 तास असल्यास व्हिसाची आवश्यकता असते का?

प्रश्न- अमेरिकेतून कनेक्टिंग फ्लाइट पकडायची असल्यास व्हिसा गरजेचा असतो का? लेओव्हर 2-3 तास असला तर?उत्तर- होय, व्हिसा व्हेवर प्रोग्रामसाठी पात्र नसणाऱ्या परदेशी नागरिकांना प्रवास करताना अमेरिकेत थांबायचं असल्यास व्हिसा गरजेचा असतो. कनेक्टिंग फ्लाईटदरम्यानचा कालावधी कितीही असला, तरी व्हिसाची आवश्यकता असते. तुम्ही अमेरिकेतलं विमानतळ न सोडता पुढच्या प्रवासाला निघणार असाल, तरीही व्हिसा गरजेचा असतो. काही देशांमध्ये (बर्मुडा किंवा कॅरेबियन बेटांवरील देश) जाताना अमेरिकेतूनच जावं लागतं, याची जाणीव अमेरिकेच्या दूतावासाला आहे. तर काही देशाच्या नागरिकांना कमी अंतराच्या प्रवासासाठी अमेरिकेचा व्हिसा गरजेचा नसतो. भारतीय नागरिकांना अमेरिकेतून पुढे जायचं असल्यास त्यांच्याकडे वैध व्हिसा हवा. तुमच्याकडे वैध प्रवासी (बी1/बी2) व्हिसा असल्यास, तुम्ही अमेरिकेतून पुढे जाण्यासाठी त्याचा वापर करू शकता. भारतीय नागरिकांना दहा वर्षांच्या कालावधीसाठी बी1/बी2 व्हिसा दिला जातो. त्यामुळे अमेरिकेतून पुढे जाण्यासाठी स्वतंत्र व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला अमेरिकेतल्या मित्राच्या घरी जायचं असल्यास किंवा फिरायचं असल्यास प्रवासी व्हिसा असणं गरजेचं आहे. अमेरिकेत थोडा वेळ थांबायचं असल्यास आणि लगेच दुसऱ्या देशात जाण्यासाठी निघायचं असल्यास वेगळ्या प्रकारचा व्हिसा दिला जातो. या व्हिसाला सी-1 व्हिसा म्हटलं जातं. या व्हिसामुळे अमेरिकेत दीर्घ काळ मुक्काम करता येत नाही. तुमच्या प्रवासाचा अवधी सी-1 व्हिसाच्या अटी, शर्तींमध्ये बसत असल्यास तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. याबद्दलची माहिती http://www.ustraveldocs.com/in उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिसाचं शुल्क भरून बायोमेट्रिक्स अपॉईनमेंट घ्यावी लागते. यानंतर तुम्हाला मुलाखत द्यावी लागते. तुमच्या प्रवासाचा तपशील यावेळी द्यावा लागतो. तुम्ही अमेरिकेतल्या कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबणार आहात, याची तपशीलवार माहिती देणं गरजेचं असतं. तुम्ही पुढील विमानात चढण्याआधी किती वेळ प्रतीक्षा करणार आहात, त्याचा किमान कालावधी द्यावा लागतो. अनेकदा प्रवासी विमानतळदेखील सोडत नाहीत. मात्र प्रवासाचा तपशील दिल्यावर व्हिसा मिळेलच असं नाही. सी-1 आणि बी-1/बी-2 व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी असलेले निकष जवळपास सारखेच आहेत. सध्या अमेरिकेकडून भारतीयांना पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीचा सी-1 व्हिसा दिला जातो. त्यामुळे अमेरिकन दूतावासाकडून बी-1/बी-2 व्हिसासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. या व्हिसाची मुदत सी-1 व्हिसाच्या दुप्पट आहे. बी-1/बी-2 व्हिसाचा वापर ट्रान्झिट आणि टुरिझम अशा दोन्हींसाठी वापरता येतो.  

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाVisaव्हिसा