शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

लंडनमध्ये हिंदुजा यांची तीन वर्षांनंतर दिवाळी! ३०० हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:23 IST

लंडनच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनलेला तसेच गतकाळातील पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण समजला जाणारा हिंदुजांचा वार्षिक दिवाळी सोहळा यंदा तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या थाटामाटात साजरा झाला.

लंडन :

लंडनच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनलेला तसेच गतकाळातील पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे महत्त्वपूर्ण समजला जाणारा हिंदुजांचा वार्षिक दिवाळी सोहळा यंदा तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या थाटामाटात साजरा झाला. कोरोनामुळे या सोहळ्याला ब्रेक लागला होता. ऋषी सुनक इंग्लंडच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याने यंदा या कार्यक्रमाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. 

हिंदुजा यांच्या कार्लटन हाऊस टेरेस येथे हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी आमंत्रित खासदार, राजदूत आणि मुत्सद्दी अधिकारी, बडे व्यावसायिक, नेते आणि पत्रकारांसह ३०० हून अधिक पाहुण्यांचे स्वागत हिंदुजा कुटुंबाकडून करण्यात आले. राजे चार्ल्स तृतीय यांचे मुख्य खासगी सचिव सर क्लाइव्ह अल्डरटन यांनी नवनियुक्त राजांकडून दिवाळीच्या विशेष शुभेच्छा दिल्या. लंडनमधील हिंदू समुदायाचे कौतुक करताना महापौर सादिक खान म्हणाले, ‘लंडन हे जगातील सर्वात मोठे शहर आहे आणि यामागील एक कारण म्हणजे हिंदू धर्मातील लंडनवासीयांनी दिलेले मोठे योगदान हे आहे.’  उपस्थित पाहुण्यांचे स्वागत हिंदुजा समूहाचे सहअध्यक्ष गोपीचंद हिंदुजा तसेच त्यांचे बंधू प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी दिवाळीचे महत्त्व, देवी लक्ष्मीबद्दल आणि दानाच्या कर्मातून मिळालेला आशीर्वाद आणि समाधानाचा समावेश कसा होतो, याबद्दल सांगितले. गोपीचंद हिंदुजा यांनी त्यांचे थोरले बंधू एस. पी. हिंदुजा यांची उणीव भासत असल्याचे सांगत प्रकृती ठीक नसल्याने ते सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत, अशी खंतही व्यक्त केली. 

मजूर पक्षाचे अध्यक्ष खासदार नदिम झहावी, कोरोना काळात माजी आरोग्य सचिव राहिलेले खासदार मॅट हॅनकॉक, विम्बल्डनचे परराष्ट्र कार्यालय मंत्री लॉर्ड अहमद आणि लंडनचे महापौर सादिक खान यांनी या सोहळ्यासाठी सर्व धर्म, समुदाय आणि राजकीय परिप्रेक्ष्यातील इतक्या लोकांना एकत्र आणल्याबद्दल हिंदुजा कुटुंबाचे आभार मानले. मान्यवरांना लक्ष्मीची मूर्ती भेटकमल प्रकाश हिंदुजा व हर्ष अशोक हिंदुजा यांनी  मान्यवरांना लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून दिली. अर्जुन रामपाल, त्याची जोडीदार गॅब्रिएला, पार्श्वगायिका कुनिका कपूर, आर्सेलरच्या एल. एन. मित्तल यांच्या पत्नी उषा मित्तल तसेच ३८ देशांतील २२ उच्चायुक्तांसह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. दिवाळीच्या परंपरेला आणि हिंदुजा कुटुंबाच्या आचारसंहितेला अनुसरून यावेळी पाहुण्यांनी निवडक शाकाहारी भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.