शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विचित्रपणाचा कळस! मॉलमध्ये खाण्याच्या वस्तूंवर थुंकत होती महिला; सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:58 IST

तिच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

एक अमेरिकन महिलेला मॉलमध्ये (Woman In Shopping Mall) विचित्रपणा करताना पाहून लोक सोशल मिडियावरून संताप व्यक्त करत आहेत. खरेदीसाठी मॉलमध्ये गेलेल्या एका महिलेने तेथील अनेक वस्तू उष्ट्या करून करून पुन्हा ठेवल्या. तिच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दक्षिण अमेरिकेतील Nashville येथील आहे. येथे एका मॉलमध्ये गेलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. ही महिला मॉलमध्ये चिप्सचे पॅकेट फोडून त्याची चव बघताना आणि नंतर त्याच पॅकेटमध्ये थुंकून ते सीलबंद करून ठेवताना दिसत आहे.

मॉलमधील खाण्या-पिण्याच्या वस्तू करतेय खराब!या महिलेने पाण्याच्या बाटलीबरोबरही असेच केले. तिने पाण्याची बाटली उचलली, तोंड लावून पाणी प्यायले आणि बाटली परत ठेवून दिली. या महिलेची ओळख पटली असून ती मेकअप आर्टिस्ट लिब्बी बार्न्स (Libby Barnes) असल्याचे समजते. बार्न्सने सोडा आणि कँडीसोबतही असेच कृत्य केल्याचे बोलले जात आहे. मात्र, तिचा हा व्हिडिओ कुणी तयार केला, हे स्पष्ट झालेले नाही. पण असे दिसून येते, की लिब्बी बार्न्सला स्वतःचा व्हिडिओ होत असल्याची चिंता नव्हती. कारण ती अनेक वेळा कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहे. यावेळी जेव्हा एक व्यक्ती तिच्याकडे येते आणि विचारते की, 'तू चोरी करत आहेस?'

यावर उत्तर देताना लिब्बी म्हणते, 'मी चोरी करत नाहीये. मी या वस्तू (उष्ट्या केलेल्या वस्तू) खरेदी करणार आहे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या." वृत्तानुसार, बार्न्सने स्टोअर सोडण्यापूर्वी त्या वस्तूंसाठी पैसेही दिल्याचे समजते.

पण, या घटनेचा व्हिडिओ समोर येताच एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी महिलेच्या अटकेची मागणी सुरू केली. यासंदर्भात, स्टोअरने स्पष्टिकरण देताना म्हटले आहे, की संबंधित महिलेने त्या वस्तू स्वत:च खरेदी केल्या होत्या आणि त्यासाठी पैसेही दिले होते. याशिवाय, स्टोअरने ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे आणि चौकशीचे आदेशही दिले आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाShoppingखरेदीWomenमहिलाSocial Mediaसोशल मीडिया