ब्रह्मांडातील रहस्यांचा नासा करणार खुलासा

By admin | Published: February 22, 2017 08:44 PM2017-02-22T20:44:46+5:302017-02-22T20:49:28+5:30

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रह्मांडाशी संबंधित रहस्यांचा उलगडा करण्याचे संकेत दिले आहेत

Disclosure of NASA to the secrets of the universe | ब्रह्मांडातील रहस्यांचा नासा करणार खुलासा

ब्रह्मांडातील रहस्यांचा नासा करणार खुलासा

Next

ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 22 - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रह्मांडाशी संबंधित रहस्यांचा उलगडा करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी नासानं आज (अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार) दुपारी 1 वाजता न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं आहे. नासानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धी पत्रकात सूर्य आणि अन्य ता-यांच्या भ्रमणासंबंधी एक्सोप्लॅनेटशी संबंधित रोमांचक माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात सूर्य आणि दुस-या ता-यांसंबंधी नवी माहिती देण्यात येणार आहे. नासाच्या हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात येणार असून, नासाच्या वेबसाइटवरही या कार्यक्रमाची लाइव्ह माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे नासाच्या या कार्यक्रमात खगोल वैज्ञानिक आणि अवकाश संशोधक भाग घेणार आहेत. या लाइव्ह कार्यक्रमादरम्यान #AskNasa  हे हॅशटॅग वापरून त्यांना प्रश्नही विचारता येणार आहेत.

पत्रकार परिषदेनंतर नासा रेडिट AMA(आस्क मी एनिथिंग)चंही आयोजन करणार आहे. यात प्रश्न विचारण्यात आलेल्या लोकांना उत्तरंही मिळणार आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी आतापर्यंत 114 ग्रहांचा शोध लावला आहे. त्यातील काही ग्रहांवर जीवन आणि एलियनच्या अस्तित्वासंबंधीही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत आज या रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Disclosure of NASA to the secrets of the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.