शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

VIDEO- कुत्र्यासारखा भुंकणारा पोपट तुम्ही पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 07:32 IST

पोपटाच्या विशिष्ट आवाज काढण्याच्या कलेमुळे तो जगभरातल्या पक्षीप्रेमींच्या पसंतीस उतरतो.

लंडन, दि. 14 - पोपटाच्या विशिष्ट आवाज काढण्याच्या कलेमुळे तो जगभरातल्या पक्षीप्रेमींच्या पसंतीस उतरतो. त्याच्या गोड गोड आवाज काढण्यानं सगळ्यांनाच तो आपलासा वाटतो. ब-याचदा लोक पोपटाला पिंज-यात बंदिस्त करून ठेवतात. मात्र आकाशात स्वच्छंदी विहारणार पोपट अनेकांना भावतो. घरातल्या प्रत्येकाला नावानं हाक मारण्याच्या त्याच्या शैलीमुळे तो कुटुंबातला एक सदस्यच होऊन जातो. नावानं हाक मारण्यासोबत पोपट ब-याचदा निरनिराळे आवाजही काढतो. शिट्या मारण्यासह आवाज काढण्यात पोपटाचा कोणीही हात धरू शकत नाही. माणसांची नावं घेताना तुम्ही पोपटाला पाहिलं असेलच, मात्र कुत्र्याचा आवाज काढणारा पोपट कोणाच्या गावीही नसेल. अशाच प्रकारच्या कुत्र्याचा आवाज काढणा-या एक पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला बरेचशे लाइक आणि शेअरही मिळाले आहेत. कुत्र्यांच्या सहवासात राहिल्यामुळे हा पोपट भुंकत तर नसेल ना, याबाबतही अस्पष्टता आहे. पण तरीही हा कुत्र्याच्या आवाजात भुंकणार पोपट खूपच व्हायरल होतोय.

 वन्य जीव कायद्यानुसार पोपट किंवा अन्य कोणताही पक्षी बंदिस्त करून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, शहरातील बहुतांश घरात आजही पोपटांना पिंजऱ्यात कैद केल्याचे दिसून येते. त्यामुळे परंपरागत चालणारी पोपटांची कैदेची मालिका कधी संपणार, असा सवाल वन्यप्रेमी उपस्थित करीत आहेत. वनकायद्याची सर्रास पायमल्ली होत असताना वनविभाग मात्र बघ्यांची भूमिका घेत आहेत. पोपट हा पाळीव पक्षी आहे. मनुष्याचे अनुकरण करून तसेच शब्दोच्चार करणे, हे पोपटाचे वैशिष्ट्य. त्यामुळे घरोघरी पोपटाला पिंजऱ्यात कैद करून पाळण्यावर भर दिला जातो. मात्र, पोपट हा वन्यजीव अधिनियमात मोडणारा पक्षी आहे. पोपटाला बंदिस्त करून ठेवणे हे वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन ठरते. हा बोलका वन्यजीव अधिक काळ एकाच घरात असल्यास तो घरातील मंडळींना नावाने हाक मारतो. त्यामुळे तो सर्वांच्याच आवडीचा पक्षी बनला आहे. मात्र, त्याला शोभेची वस्तू म्हणून कैद करून ठेवणे हा अपराध ठरतो. ही बाब वनविभागाला माहीत असतानाही कोणतीच कारवाई केली गेली नाही. आणखी किती दिवस पोपटांना बंदिस्त राहून जीवन जगावे लागेल, असा प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी केली जात असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील काही शिकारी पोपटांची घरटी शोधून त्यांची पिल्ले गोळा करतात आणि पालनपोषण करून त्यांची विक्री करतात. ‘लव्हबर्ड’सारख्या पक्ष्यांच्या आड पोपटांचीही विक्री जिल्ह्यात होत असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे या तस्करांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींची आहे.