शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ढाका ठप्प; विद्यार्थीच तपासू लागले वाहतुकीचे परवाने आणि कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 17:44 IST

गेले पाच दिवस हे आंदोलन सुरु आहे. सुरक्षित प्रवासासाठी चांगले रस्ते मिळावेत यासाठी संपूर्ण बांगलादेशात आंदोलन सुरु आहे.

ढाका- बांगलादेशची राजधानी ढाका शहर आणि इतर देशाचा संपर्क तोडण्यात आंदोलक यशस्वी झाले आहेत. सर्व स्थानिक व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद पाडण्यात आंदोलकांना यश मिळाले. गेले पाच दिवस हे आंदोलन सुरु आहे. सुरक्षित प्रवासासाठी चांगले रस्ते मिळावेत यासाठी संपूर्णबांगलादेशात आंदोलन सुरु आहे.

रविवारी दोन महाविद्यालयीन तरुणांचा दोन बसमध्ये सापडून मृत्यू झाला. यामुळे हजारो नागरिक सरकारचा निषेध करण्यासाठी बाहेर पडले आणि संपूर्ण देशात हे आंदोलन पेटले. या आंदोलनाची धुरा विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये घेतली असून ते रस्त्यावरची प्रत्येक गाडी थांबवून चौकशी करत आहेत. प्रत्येक गाडीची नोंदणी झाली आहे का तसेच चालकाकडे परवाना आहे का याचीही चौकशी ते करत आहेत.  एका मंत्र्याच्या गाडीची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना गाडीमधून बाहेर पडावे लागले असे वृत्त काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. आज सकाळी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाचे चिन्ह राजधानी ढाक्यात दिसत नव्हते मात्र अचानक लोकांनी मानवी साखळी करत वाहतूक सुधारणा करण्याचे आवाहन सरकारला केले.रविवारी दोन बसेस ग्राहक मिळविण्यासाठी स्पर्धा करत होत्या. त्याच गडबडीमध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर दोन्ही चालक पळून गेले मात्र नंतर त्यांना अटक करण्यात आली. बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट वर्कर फेडरेशनचे वरिष्ठ नेते अब्दुर रहिम यांनी संरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही बसेस बाहेर काढणार नाही असे स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी काही बसेस फोडल्या आहेत. आम्ही या व्यवसायामध्ये पैसे गुंतवलेले आहेत. आंदोलनाच्या नावाखाली आमच्या बसेस जाळू देणार नाही, आम्हालाही संरक्षण पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीयChakka jamचक्काजामStrikeसंप