शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 08:05 IST

रईसी हे पूर्वी मौलवी होते. त्यांनी एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलण्याआधी इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत हाती घेतली होती.

दुबई : इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या आदेशानुसार १९८८ साली त्या देशात अनेकांना सामुदायिक फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या गोष्टीचे पालन होण्यासाठी यंत्रणांवर बारीक लक्ष ठेवण्याचे, अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे समृद्ध युरेनिअम बनविण्याच्या जवळ इराणला पोहोचविण्याचे काम कट्टरपंथी नेते व राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केले होते. रविवारी रात्री झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा व त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला.रईसी हे पूर्वी मौलवी होते. त्यांनी एकदा संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलण्याआधी इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणची प्रत हाती घेतली होती. २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांचा हसन रुहानी यांनी पराभव केला होता. त्यानंतर चार वर्षांनी रईसी राष्ट्राध्यक्ष होतील अशी नेपथ्यरचना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी केली होती. 

इराणच्या अणू कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी पाहणी करावी म्हणून इस्रायलने चालविलेल्या मोहिमेविरोधात इब्राहिम रईसी यांनी आवाज उठविला हाेता. अमेरिका घालत असलेले निर्बंध हे जगातील देशांशी युद्ध छेडण्याची एक नवी रणनीती आहेे, असे त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सप्टेंबर २०२१मध्ये सांगितले होते. 

इराणच्या परराष्ट्र धोरणावर रईसी यांची छाप- इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीराब्दोल्लाहियान (वय ६० वर्षे) हे देखील कट्टरपंथी नेते होते. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी तसेच राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या विचारांनुसार हुसैन यांनी त्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची आखणी केली होती. त्यांचाही रविवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

- इराणचा अमेरिकेला असलेला तीव्र विरोध, युक्रेन युद्धात इराणने रशियाला पुरविलेली बॉम्बवाहू ड्रोन, इराणने इस्रायलवर केलेले हल्ले, दहशतवादी गटांना पुरविलेली मदत या सर्व घटना हुसैन अमीराब्दोल्लाहियान यांच्या कार्यकाळात घडल्या.

अझरबैजानमधील धरणाच्या उद्घाटनावेळी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहम अलीयेव्ह यांच्यासाेबतची इब्राहिम रईसी यांची ही भेट अखेरची ठरली.

- इराणमध्ये इस्लामी क्रांती झाल्यानंतर त्यानुसार व्यवस्थाबदल करण्यात ज्यांनी हातभार लावला त्यात रईसी यांचा समावेश होता.

रशियाला पुरविली हाेती ड्राेनरईसी यांच्या कार्यकाळात, इराणने युरेनियमचे शस्त्रास्त्र-दर्जाच्या पातळीच्या जवळ नेहमीपेक्षा अधिक समृद्ध केले, ज्यामुळे पश्चिमेसोबतचा तणाव आणखी वाढला, कारण तेहरानने युक्रेनमधील युद्धासाठी आणि संपूर्ण प्रदेशातील सशस्त्र मिलिशिया गटांना रशियाला बॉम्ब वाहून नेणारे ड्रोनदेखील पुरवले. 

इराणची बिघडलेली आर्थिक स्थिती, महिलांच्या अधिकारांबद्दल तेथील सरकारने घेतलेली संकुचित भूमिका याबद्दल त्या देशात उग्र निदर्शने झाली होती. रईसी यांच्या कार्यकाळात इराण अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे समृद्ध युरेनिअम बनविण्याच्या जवळ इराण पोहोचला होता. तसेच युक्रेन युद्धात रशियाला बॉम्ब वाहून नेणारी ड्रोन पुरविणाऱ्या इराणवर पाश्चिमात्य देशांचा रोष आणखी वाढला होता. इराणने काही दहशतवादी गटांनाही मदत केली होती.

टॅग्स :IranइराणHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना