शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण, ऊर्जेस बळ! PM मोदी-मॅक्रॉन यांच्यात चर्चा; स्वत: विमानतळावर सोडायला आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:33 IST

मोदी बुधवारी फ्रान्सहून अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी स्वत: मॅक्रॅान हे मार्सेलिस येथील विमानतळावर मोदींना निरोप देण्यासाठी आले

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी फ्रान्स दौऱ्यानंतर अमेरिकेला रवाना झाले. फ्रान्स दौऱ्यात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा या विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली.

आरोग्याबाबत डिजिटल माध्यमातून सुविधा, आरोग्यतज्ज्ञांमध्ये होणारे आदानप्रदान या गोष्टींबाबत दोन्ही देशांत असलेल्या सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी मॅक्रॉन या दोघांनी घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अणुभट्टी बांधण्याचा मनोदय दोन्ही देशांनी व्यक्त केला.अमेरिकेसोबत महत्त्वाचे करार?मोदी बुधवारी फ्रान्सहून अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी स्वत: मॅक्रॅान हे मार्सेलिस येथील विमानतळावर मोदींना निरोप देण्यासाठी आले. अमेरिका दौऱ्यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. तसेच दोन्ही देशांत महत्त्वाचे करार होण्याचीही शक्यता आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यातच ट्रम्प यांना भेट देणारे मोदी हे चौथे परदेशी नेते असतील. 

सावरकरांच्या आठवणी जागवल्याफ्रान्समधील मार्सेलिस बंदराजवळ उभ्या असलेल्या बोटीच्या पोर्टहोलमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भर समुद्रात उडी घेऊन स्वत:च्या सुटकेचा साहसी प्रयत्न ८ जुलै १९१० रोजी केला होता. या महान क्षणाची आठवण जागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौऱ्यादरम्यान मार्सेलिस येथे बुधवारी सावरकरांना आदरांजली अर्पण केली. 

भारतीयांना अमानुषपणे का वागवले हे विचारा? अमेरिकेतील भारतातील स्थलांतरितांना मायदेशी पाठविताना त्यांना अमानुष वागणूक देऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले घनिष्ठ मित्र व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगायला हवे होते. भारतीयांना अशी वागणूक का दिली, असा प्रश्न त्यांनी ट्रम्प यांना विचारायला हवा, असे खरगे यांनी म्हटले आहे. मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्यावेळी ते ट्रम्प यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे वक्तव्य केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका