शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:10 IST

dipu chandra das mob lynching : संबंधित फॅक्ट्री व्यवस्थापनाने वेळीच पोलिसांना माहिती दिली असती तर, कदाचित दीपूचा जीव वाचला असता...

बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात २७ वर्षीय दीपूचंद्र दास (वय २७) नावाच्या एका हिंदू फॅक्टरी कामगार तरुणाची धर्मांध जमावाने अतीशय निर्घृनपणे हत्या केल्यानंतर, सातत्याने नव नवे खुलासे होताना दिसत आहेत. ईशनिंदेच्या केवळ संशयावरून या  हिंदू तरुणाचे 'मॉब लिंचिंग' झाले. खरे तर, इस्लामिक कट्टरपंथी धर्मांध सैतानांनी केलेली ही निर्घृण हत्या म्हणजे, मानुसकीलाच काळिमा फासणारी घटना आहे. तपासातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे. संबंधित फॅक्ट्री व्यवस्थापनाने वेळीच पोलिसांना माहिती दिली असती तर, कदाचित दीपूचा जीव वाचला असता. 

व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात -महत्वाचे म्हणजे, या घटनेच्या तपासात फॅक्टरी व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार,  ज्यावेळी दीपूवर इशनिंदेचे आरोप झाले, त्याचवेळी व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून त्याला संरक्षण दिले असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती,  त्सुयाची जीवही वाचला असता. मात्र व्यवस्थापनाने त्याला संरक्षण न देता जबरदस्तीने त्याचा राजीनामा घेतला आणि त्याला बाहेर दबा धरून बसलेल्या धर्मांध सैतानांच्या स्वाधीन केले.

सहकाऱ्यांनीच धोका दिला...!धक्कादायक गोष्ट म्हणजे, दीपू सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीच त्याला धोका दिला. दीपूला मारहाण करणाऱ्या जमावात तेही सामील झाले. अत्यंत वेदनादायक गोष्ट म्हणजे, त्या सैतानांच्या जमावाने दीपूची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला लटकवून पेटवून दिला. ईशनिंदा केल्याचा कुठलाही पुरावा नाही -यासंदर्भात बोलताना, दीपूने ईशनिंदा केल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळालेला नाही, प्रत्यक्षदर्शींनी अशा कोणत्याही आक्षेपार्ह विधानाची पुष्टी केलेली नाही. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीवरून असे दिसून येते की, ही घटना पूर्वनियोजित होती, फॅक्ट्री सुपरवायझर्सनी दीपूला जबरदस्त राजीनामा देण्यास भाग पाडले. यानंतर त्याला सैतानी जमावाच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर, त्या जमावाने त्याची हत्या केली. यानंतर त्याला झाडाला लटकवून, त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आले. यावेळी कट्टरपंथी सैतान त्याच्याभोवती जल्लोष करत घोषणाबाजी करत होते, असे 'रॅपिड ॲक्शन बटालियन'ने (RAB) आणि तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayal in Bangladesh: Friends Involved in Hindu Man's Murder

Web Summary : Dipu Chandra Das, a Hindu factory worker, was brutally murdered in Bangladesh following blasphemy accusations. Shockingly, colleagues betrayed him, joining the mob. Management's role is questioned; they allegedly forced his resignation and handed him over to the mob, who lynched and burned him. Twelve arrests have been made.
टॅग्स :BangladeshबांगलादेशPoliceपोलिस