शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक फंगसने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:07 IST

Candida Auris : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक व्हायरस असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. मात्र आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक व्हायरस असल्याची माहिती मिळत आहे. एका फंगसने शास्त्रज्ञांची चिंता वाढवली असून तो धुमाकूळ घालू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 

"कँडिला ऑरिस" असं या फंगसचं नाव असून तो ब्लॅक प्लेगचा प्रसारामधून निर्माण होत आहे. हा फंगस अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते कोरोना व्हायरसपेक्षाही मोठी महामारी आणण्यासाठी हा फंगस सक्षम आहे. त्यामुळेच "कँडिला ऑरिस" हा जास्त खतरनाक ठरत आहे. तसेच याचा प्रसार देखील वेगाने होत आहे. डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सेंटरच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कँडिला ऑरिस हा अधिक प्रभावी असल्याने त्यावर अँटीफंगल औषधांचा देखील परिणाम होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. 

जमिनीवर खूप वेळ जिवंत राहू शकतो "हा" फंगस

सीडीसीशी संबंधित शास्त्रज्ञांनी या फंगसचा प्रसार रुग्णालयात झाला तर तो खूपच जास्त धोकादायक होईल असं म्हटलं आहे. लंडन इम्पीरिअल कॉलेजमधील महामारी विशेषज्ञ जोहाना रोड्स यांनी "कँडिला ऑरिस" हा जमिनीवर खूप वेळ जिवंत राहू शकतो असं म्हटलं आहे. तसेच रोड्स 2016 मध्ये या फंगसमुळे निर्माण झालेल्या संक्रमणावर ताबा मिळवणाऱ्या टीममध्ये होत्या. तसेच माकडांमुळे याचा संसर्ग होत असल्याने त्याची ब्लॅक प्लेगसोबत तुलना होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

बापरे! बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3000 डोस जप्त; 80 जणांना अटक

कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये बनावट लस पुरवठा करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. चीनच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी 80 हून अधिक जणांना अटक केली आहे. टोळीकडून तीन हजारांहून अधिक बनावट डोस जप्त करण्यात आले आहे. यामुळे तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. चीनी वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या टोळीकडून गेल्या सप्टेंबर महिन्यांपासून बनावट लसीचा पुरवठा सुरू होता. पोलीस या बनावट लसीच्या मागावर होते. अखेर या टोळीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आलं. ग्लोबल टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये या बनावट लसी परदेशातही पोहचवण्याचा या टोळीचा प्रयत्न असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. पोलिसांनी बीजिंग, शांघाई, पूर्व प्रांतातील शानदोंगसह अनेक ठिकाणी छापेमारी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीय