शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इंडोनेशियात व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं 6 किलो प्लास्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:29 IST

वाकटोबी नॅशनल पार्कमध्ये सापडला मृतदेह

जकार्ता: प्लास्टिकचा अतिवापर आणि त्याचे निसर्गावर होणारे परिणाम किती भीषण आहेत, याची प्रचिती वारंवार येताना दिसतेय. इंडोनेशियात एका व्हेल माशाचा मृत्यू झालाय. या माशाच्या पोटात तब्बल 6 किलो प्लास्टिक आढळून आलंय. वाकटोबी नॅशनल पार्कमधील कापोटा बेटाजवळ हा मासा मृतावस्थेत आढळून आलाय. मृत व्हेलच्या पोटात नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आलंय. यामध्ये प्लास्टिकच्या 25 पिशव्या, 4 पाण्याच्या बाटल्या,  सँडल, प्लास्टिकच्या 115 कप्सचा समावेश आहे. याशिवाय माशाच्या पोटात एक गोणीदेखील आढळून आलीय. त्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक तारा आहेत. या माशाचा मृत्यू प्लास्टिक खाल्ल्यामुळे झाला का, याची खात्रीशीर माहिती अद्याप उपलब्ध झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या या व्हेल माशाच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे. याआधी जून महिन्यात थायलंडमध्ये एक व्हेल मासा मृतावस्थेत आढळला होता. त्या माशाच्या पोटातून जवळपास 17 पौंड (6 किलो) प्लास्टिक आढळून आलं होतं. त्या माशाच्या पोटात 80 हून अधिक प्लास्टिक पिशव्या होत्या. जगातील बहुतांश देश मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात. यातील 50 टक्के कचरा चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या पाच देशांकडून टाकला जातो. याला आळा न घातल्यास येत्या दशकभरात समुद्रातील प्लास्टिकचं प्रमाण तिपटीनं वाढेल आणि सागरी जीवन मोठ्या संकटात सापडेल.  

टॅग्स :environmentवातावरण