शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोस्ट वाँटेड दाऊद मलिकची पाकिस्तानमध्ये हत्या; दहशतवादी मसूद अझहरच्या जवळच्या सहकाऱ्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 23:37 IST

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तात दाऊद मलिक याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. 

पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी भारताच्या एका शत्रूची हत्या केल्याचे वृत्त आहे. लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक याची वझिरीस्तानमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दाऊद मलिक हा भारतातील मोस्ट वाँटेड जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरचा जवळचा सहकारी असल्याचे म्हटले जात होते. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तात दाऊद मलिक याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. 

वृत्तानुसार, उत्तर वझिरीस्तानमधील मिराली येथे दाऊद मलिकची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान, दहशतवादाचे धोरण आणि भारतविरोधी हत्यार म्हणून वापर करणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा झटका बसला आहे. दाऊद मलिकसारख्या दहशतवाद्याच्या अज्ञात हत्येच्या घटनेने पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. दुसरीकडे, ज्यांनी दाऊद मलिकची हत्या केली, ते गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाले. 

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून आणखी एका अज्ञात व्यक्तीचा विकृत मृतदेह जप्त केला आहे. काही रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दाऊद मलिक एका खाजगी दवाखान्यात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, लष्कर-ए-जब्बारच्या विकासातील दाऊद मलिकची भूमिका आणि दहशतवाद्यांच्या व्यापक नेटवर्कशी असलेले त्याचे संबंध यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत होती.

मलिक हा भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला १७ वा दहशतवादी असून त्याची गूढपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी  खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर आणि सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनेके यांची कॅनडात हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी कराचीमध्ये झहूर यांची हत्या झाली होती. त्यापाठोपाठ कॅनडा-आधारित दहशतवादी रिपुदमन सिंग मलिक होता, ज्यावर एअर इंडिया फ्लाइट १८२ वर बॉम्बस्फोट केल्याचा आरोप होता आणि त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या हल्ल्यात ३०० हून अधिक लोक मारले गेले होते. जुलै २०२२ मध्ये कॅनडामध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndiaभारत