लंडन - सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबूक डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला असून, सुमारे 87 मिलियन (म्हणजेच 8 कोटी 70 लाख) फेसबुक युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाने गोळा केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुमारे 50 मिलियन युझर्सचा डेटा चोरण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. खूप मोठा आहे. फेसबूकचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफीसर माईक स्कूफर यांनी लिहिलेल्या ब्लॉगमधून ही माहिती समोर आली आहे. अॅप्लिकेशन्सद्वारे फेसबूकशी जोडले जाणारी त्रयस्त मंडळी युझर्सची माहिती चोरत असल्याचे द गार्डियनने म्हटले आहे. दरम्यान, हे प्रकार रोखण्यासाठी फेसबूक युझर्सची वैयक्तिक माहिती अधियक सुरक्षित ठेवण्यासाठी काही बदल करणार आहे. या बदलांनुसार थर्ड पार्टी अॅपच्या डेव्हलपर्सना फेसबुक युझर्सच्या वॉलवरील माहितीचा अॅक्सेस मिळणार नाही.
फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 04:40 IST