शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

यूरोपच्या 'या' 3 शहरांखालची जमीन तापतीये, ज्वालामुखींमुळे धोका वाढला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 11:18 IST

येथील जमिनीखालील लाव्हारसाचा प्रवाह वाढलाय. ही स्थिती संपूर्ण पश्चिम यूरोपमध्ये आहे, पण सर्वात जास्त धोका जर्मनीतील तीन शहरांना आहे.

एकीकडे कोरोनाने जगभरात हाहाकार माजला असून अशात यूरोपमधून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. यूरोपातील तीन शहरांखाली ज्वालामुखींची सक्रियता वाढली आहे. जर्मनीतील तीन शहरांखाली हे ज्वालामुखी अधिक सक्रिय झाले आहेत. येथील जमिनीखालील लाव्हारसाचा प्रवाह वाढलाय. ही स्थिती संपूर्ण पश्चिम यूरोपमध्ये आहे, पण सर्वात जास्त धोका जर्मनीतील तीन शहरांना आहे.

यूरोपमधून मिळवण्यात आलेल्या डेटानुसार, यूरोपमध्ये जमिनीखाली ज्वालामुखीची सक्रियता फार जास्त वाढली आहे. याचा रिपोर्ट जिओफिजिकल जर्नल इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झालाय. यूरोपच्या उत्तर-पश्चिम भागातील जमिनीखाली हालचाल फार जास्त वाढली आहे.

जमिनीखाली लाव्हारसाचा प्रवाह वाढल्याने पश्चिम-मध्य जर्मनीतील तीन शहरे धोक्यात आली आहेत. ही तीन शहरे जर्मनीच्या द आयफेल रीजनमध्ये येतात. आशेन, ट्रायर आणि कोबलेंज अशी या तीन शहरांती नावे आहेत.

द आयफेल रीजन हजारो वर्षांपासून ज्वालामुखीचं केंद्र राहिला आहे. तुम्हाला या परिसरात अनेक गोलाकार छोटे-मोठे सरोवर दिसतील. हे हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीमुळे तयार झाले आहेत. यांना जर्मनीमध्ये मार्स म्हणतात. 

याच ज्वालामुखीय हालचालीमुळे द आयफेल रीजनमध्ये सर्वात मोठं सरोवर लाशेर सी तयार झालं. असे म्हणतात की, इथे 13 हजार वर्षाआधी एक फार मोठा विस्फोट झाला होता. ज्यामुळे हा सरोवर तयार झाला.प्राध्यापक कॉर्न क्रीमर म्हणाले की, जगभरातील जास्तीत जास्त वैज्ञानिकांचं हेच मत आहे की, द आयफेल रीजनमध्ये ज्वालामुखींची हालचाल बंद झाली आहे. पण जर सर्वच बिंदूंवर लक्ष दिलं तर हे कळून येतं की, उत्तर-पश्चिम यूरोपच्या जमिनीखाली खूपकाही भयावह घडत आहे.

प्राध्यापक क्रीमर यांनी सांगितले की, द आयफेल रीजनमध्ये येणारे देश लग्जमबर्ग, पूर्व बेल्जिअम, नेदरलॅंडचा दक्षिण भाग लिमबर्गची जमीन वर उचलली जात आहे. आयफेल रीजनमध्ये होत असलेले हे बदल इतके वेगवान आहेत की, ते सहजपणे लक्षात येत आहेत.

क्रीमर सांगतात की, आमच्या रिसर्चमधून समोर येतं की, लाशेर सी आणि आयफेल रीजन्या जमिनीखाली मॅग्मा म्हणजे लाव्हारस उकडत आहे. म्हणजे आयफेल रीजन आजही सक्रिय ज्वालामुखीच्या वर बसलेला आहे.

जमिनीच्या खाली सतत वाहत असलेल्या लाव्हारसामुळे केवळ ज्वालामुखीचा उद्रेकच होणार नाही तर या संपूर्ण भागात भूकंप येऊ शकतात किंवा अनेकदा पृथ्वीला झटके बसू शकतात. पण याचा अर्थ हा नाही की, ज्वालामुखीचा उद्रेक होणे किंवा भूकंप इतक्यात येईल. पण आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.

आयफेल रीजन 5300 वर्ग किमोमीटरमध्ये पसरला आहे. याची एका बाजूची लांबी 100 किलोमीटर आहे. या क्षेत्रात जर्मनी, बेल्जिअम आणि लग्जमबर्ग हे तीन देश पूर्णपणे येतात. त्यासोबतच इतरही काही यूरोपीय देशांचे भाग जुळलेले आहेत.

Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

टॅग्स :Volcanoज्वालामुखीGermanyजर्मनी