शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:08 IST

झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० मधील सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे गंभीर परिणाम आता पाकिस्तानवर दिसून येऊ लागले आहेत. झेलम नदीवरील मंगला धरण आणि सिंधू नदीवरील तुर्बेला धरण ही पाकिस्तानमधील दोन प्रमुख जलाशयं आता कोरडी पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणच्या (IRSA) माहितीनुसार, बुधवारी पाकिस्तानला आपल्या प्रमुख जलस्रोतांमधून मिळणाऱ्या पाण्यापेक्षा सुमारे ११,१८० क्युसेक अधिक पाणी सोडावे लागले. या अतिरिक्त वापरामुळे पंजाब आणि सिंध या महत्त्वाच्या प्रांतांमधील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे.

पाकिस्तानची झाली कोंडी!

दरम्यान, भारताने आपल्या बाजूने असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील धरणांमध्ये फ्लशिंग आणि स्वच्छतेची कामे सुरू केली असून, त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आणखी घट झाली आहे. भारताने पाकिस्तानसोबत पाण्याच्या प्रवाहावरील माहिती शेअर करणंही थांबवलं आहे, जे पूर्वी सिंधू करारानुसार नियमित होत असायचं.

आयआरएसएच्या आकडेवारीनुसार, सध्या पाकिस्तानमध्ये एकूण २,४१,६११ क्युसेक पाणी येत आहे, तर २,५२,७९१ क्युसेक पाणी वापरले जात आहे, त्यामुळे दररोजचा तुटवडा मोठा आहे. पंजाबला यावर्षी १,१४,६०० क्युसेक पाणी मिळाले, जे गेल्या वर्षीच्या १,४३,६०० क्युसेकच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. सिंध प्रांतातही अशीच टंचाई अनुभवली जात आहे.

पाण्यावाचून पाकिस्तानमध्ये हाहाकार 

याआधी आयआरएसएच्या सल्लागार समितीने १ मे ते १० जून या कालावधीसाठी २१% पाणीटंचाईचा इशारा दिला होता. आता जून ते सप्टेंबर अखेर ही टंचाई ७% दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे अनुमान वर्तवण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या टंचाईचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. पाण्यावाचून आता पाकिस्तानमध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर