शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात महागाईचा कहर; दूध 180 रुपये लीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:08 IST

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला

इस्लामाबाद: भारताला धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या, काश्मीरमध्ये कायम कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत आहे. पाकिस्तानमध्येमहागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. यात आता दुधाची भर पडली आहे. कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दुधाच्या दरात अचानक प्रति लीटर 23 रुपयांनी वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दुधाचा दर 180 रुपयांवर पोहोचला आहे. दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं पाकिस्तानी जनता मेटाकुटीला आली. पाकिस्तानी रुपयाचं मूल्य भारतीय रुपयाच्या तुलनेत निम्मं आहे. पाकिस्तानी जनता आधीच महागाईनं त्रस्त आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तू असलेल्या दूधाच्या दरात थेट 23 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्य जनतेचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. 'सरकारकडे वारंवार दूधाच्या दरात वाढ करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानं आम्ही स्वत:च दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला,' अशी माहिती कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दिली. चारा, इंधनासह अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचं कराची डेयरी फार्मर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यानं 'डॉन न्यूज'ला सांगितलं. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सरकारच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटलो. मात्र त्यांनी काहीच केलं नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या बाजूला प्रशासनानं असोसिएशनचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. प्रशासनाकडून दुधासाठी लीटरमागे 94 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र तरीही किरकोळ विक्रेते एक लीटर दूध 100 ते 180 रुपयांना विकत आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmilkदूधInflationमहागाई