शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत सिलिंडरचा स्फोट; ७४ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 04:09 IST

बर्निंग ट्रेन; पाकिस्तानात लाहोरहून कराचीला जाणाऱ्या एक्स्प्रेसमधील दुर्घटना

लाहोर : पाकिस्तानात लाहोर येथून कराचीला चाललेल्या तेजगाम एक्स्प्रेसमध्ये दोन गॅस सिलिंडरचा गुरुवारी पहाटे स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ७४ प्रवासी मरण पावले. मृतांमध्ये बहुसंख्यजण मुल्ला-मौलवी असून ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी चालले होते.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर या रेल्वेच्या तीन डब्यांना आग लागली. त्यामध्ये २०० प्रवासी होते. आगीमुळे घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी जीव बचावण्यासाठी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. काही प्रवाशांनी न्याहारीसाठी रेल्वेगाडीमध्येच गॅस स्टोव्हवर खाद्यपदार्थ बनवायला सुरूवात केली. त्यावेळी सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. रेल्वेमधून प्रवाशांनी ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी आहे. मात्र तरीही काही जणांनी नियम धाब्यावर बसविल्याचा फटका अनेक प्रवाशांना बसला. तबलिघी जमातने मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.तपासणीत त्रुटी : प्रवाशांनी गाडीत गॅस सिलिंडर नेले, ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली नाही. सामानाच्या तपासणीत त्रुटी राहिल्याची कबुली रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी दिली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे