शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'सेन्यार' मुळे थायलंड, मलेशियात हाहाकार; सुमात्रा बेट भूस्खलनाने हादरले, इंडोनेशियात ३०० हून अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:56 IST

'सेन्यार' चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस झाला असून, या महाभीषण नैसर्गिक आपत्तीने काही देशांना हादरवून सोडले आहे.

दक्षिण-पूर्व आशियामध्ये आलेल्या 'सेन्यार' उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस झाला असून, या महाभीषण नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हाहाकार माजला आहे, जिथे ३००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. थायलंड आणि मलेशियातही लाखो लोक विस्थापित झाले असून, या दशकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून याकडे पाहिले जात आहे.

सुमात्रा बेटावर मृतांचा आकडा ३०० पार

यावर्षी मान्सूनच्या काळात उष्णकटिबंधीय वादळांमुळे झालेल्या अतिवृष्टीने गेल्या अनेक दशकांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या पुराचा सर्वात मोठा फटका इंडोनेशियाला बसला आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर परिस्थिती अत्यंत गंभीर असून, मृतांचा अधिकृत आकडा ३०० हून अधिक झाला आहे. अजूनही अनेक लोक बेपत्ता असल्याने हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आपत्कालीन संस्थेचे प्रमुख सुहार्यंतो यांच्या माहितीनुसार, किमान २७९ लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

महत्त्वाचे रस्ते तुटले, दळणवळण विस्कळीत

सेन्यार चक्रीवादळामुळे आलेल्या महापुरात हजारो घरे वाहून गेली असून, इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. सुमात्रा बेटावरील आचेह प्रांतात राहणाऱ्या अरिनी अमालिया यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की, “पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, काही सेकंदांतच तो रस्त्यांवरून घरांमध्ये घुसला. बघता बघता घर पाण्याखाली गेले.”

या बेटाच्या उत्तर भागात पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे मुख्य रस्ते तुटले आहेत. वीज आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. प्रशासनाने तातडीने ८० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

थायलंड आणि मलेशियातही मोठे नुकसान

या चक्रीवादळाचा परिणाम केवळ इंडोनेशियापुरता मर्यादित राहिलेला नाही. शेजारील थायलंडमध्ये शनिवारीपर्यंत १६० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मलेशियातही अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी आहे. लाखो लोक या नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झाले असून, त्यांना तात्पुरत्या निवारागृहांमध्ये हलवण्यात आले आहे. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये 'सेन्यार' चक्रीवादळामुळे झालेला विनाश पाहता, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Senyar Cyclone Devastates Southeast Asia: Hundreds Dead, Millions Displaced

Web Summary : Cyclone Senyar's torrential rains triggered widespread devastation in Southeast Asia. Indonesia's Sumatra bore the brunt, with over 300 fatalities and hundreds missing. Thailand and Malaysia also suffered immense displacement, marking a major natural disaster. Rescue efforts are hampered by damaged infrastructure.
टॅग्स :cycloneचक्रीवादळIndonesiaइंडोनेशियाThailandथायलंड