शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अमेरिकेत वादळाचे तांडव; उभं राहणंही झालं कठीण, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 15:48 IST

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेच्या धरतीवर धडकलेल्या 'इयान' चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी जीवितहानी होत आहे. येथील 20 लाखांहून अधिक घरे वीजेअभावी अंधारात आहेत. हे भयानक वादळ अमेरिकेतील आतापर्यंतच्या सर्व वादळांपैकी सर्वात धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी या वादळाचा वेग ताशी 241 किलोमीटर इतका होता, या वादळात रिपोर्टींग करत असलेला पत्रकार सापडल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीमध्ये रिपोर्टर मोठ्या धाडसाने आपला जीव वाचवताना दिसत आहे.

पत्रकार मोठ्या वादळामध्ये लाईव्ह रिपोर्टींग करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात वादळाचा वेग अचानक वाढतो आणि रिपोर्टर मोठ्या धाडसाने स्वत:ला वाचवतो. यादरम्यान झाडाची एक डहाळी उडत येते आणि त्याच्या पायापाशी येऊन अडकते. तो ती डहाळी बाजूला करून पुढे सरकतो आणि खांबाला धरून उभा राहतो. लक्षणीय बाब म्हणजे तरीदेखील वादळी वाऱ्यात रिपोर्टर आपले रिपोर्टिंग चालू ठेवतो. वादळात अडकलेल्या या रिपोर्टरचे नाव जिम कॅंटर असून तो एका हवामान विभागाशी संबंधित वृत्तवाहिनीसाठी काम करतो.

'इयान' चक्रीवादळाने घातला धुमाकूळ अमेरिकेत आलेले हे धोकादायक वादळ आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता नेपल्सच्या दक्षिण-नैऋत्येस 105 किमी अंतरावर होते. ते ताशी तब्बल 17 किलोमीटर वेगाने पुढे जात होते, याबाबत माहिती देताना फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी बुधवारी 28 सप्टेंबर रोजी सांगितले की, "हे एक मोठे वादळ आहे ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे." वाटेत येणाऱ्या सर्व शहरांतील लोकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इयान चक्रीवादळाचा इशारा सुमारे 350 किमी क्षेत्रासाठी जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये टँपा आणि सेंट पीटर्सबर्गचाही समावेश आहे.

 

टॅग्स :Americaअमेरिकाcycloneचक्रीवादळweatherहवामान