Cruiser Admiral Nakhimov: डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अलास्कामधील भेटीनंतर रशिया-युक्रेन युद्ध थांबेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र, पुतिन युद्ध थांबवण्यास अद्याप तरी तयार नाहीत. अशातच, आज रशियाने युक्रेनवरल या वर्षातील तिसरा सर्वात मोठा हल्ला केला. त्यानंतर आता रशियाने २८ वर्षांनंतर आपल्या किरोव श्रेणीतील क्रूझर अॅडमिरल नाखिमोव्हची चाचणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ही जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जास्त शस्त्रास्त्र असलेल्या युद्धनौकांपैकी एक आहे.
ही रशियन युद्धनौका जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समुद्रात दाखल झाली असून, सध्या तिच्या विविध चाचण्या सुरू आहेत. २८,००० टन वजनाच्या या युद्धनौकेची अग्निशक्ती क्रूझर अॅडमिरल नाखिमोव्हला खास बनवते. यासोबतच, अॅडमिरल नाखिमोव्ह ही रशियन हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० वापरणारी पहिली युद्धनौका देखील आहे. या जहाजावर एस-४०० च्या तीन बटालियन तैनात आहेत. रशियाच्या याच एस-४०० संरक्षण प्रणालीमुळे भारताने पाकिस्तानचे हल्ले परतून लावले होते.
रशियन जहाजावर ८० क्रूझ क्षेपणास्त्रांचे शस्त्रागारमीडिया रिपोर्ट्सनुसार, या रशियन युद्धनौकेवर ८० क्रूझ क्षेपणास्त्रांचा शस्त्रागार आहे. त्यात ३एम१४टी कालिबर सारखी क्षेपणास्त्रे आहेत. २५०० किलोमीटर अंतरावर अचूक हल्ले करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये नवीन झिरकॉन सारखी जहाजविरोधी क्षेपणास्त्रेदेखील आहेत. त्यांचा वेग मॅक ९ पर्यंत आहे. त्याच्या प्रोजेक्शन चेंबर्सच्या मोठ्या भागात एस-४०० लाँग रेंज एअर डिफेन्स सिस्टीम तैनात आहे.
अॅडमिरल नाखिमोव्ह किती शक्तिशाली आहे
अॅडमिरल नाखिमोव्ह हे एस-४०० वापरणारी पहिले युद्धनौका आहे. जुन्या एस-३००एफ सिस्टीमच्या जागी नूतनीकरणादरम्यान ही सिस्टीम बसवण्यात आली होती. किरोव्ह क्लास क्रूझर एस-४०० सिस्टीमच्या तीन बटालियन वाहून नेऊ शकते, जे बहुताश देशांच्या लांब पल्ल्यावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या एकूण शस्त्रागारापेक्षा जास्त आहे.
अॅडमिरल नाखिमोव्ह हे क्रूझर लढाऊ विमान मॅक ८ पर्यंत वेगाने उडणाऱ्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना पाडण्यास देखील सक्षम आहे, तर क्षेपणास्त्र स्वतः मॅक १४ पेक्षा जास्त वेगाने उडते. रशिया-युक्रेन युद्धात एस-४०० सिस्टीमच्या ४०एन६ आणि इतर क्षेपणास्त्रांची मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली आहे.