शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: नदीत पोहणाऱ्या तरुणाच्या मागे लागली मगर, किनाऱ्यावर पोहचण्यापूर्वीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 14:54 IST

तुम्ही नदीत शांततेने पोहत आहात आणि अचानक एक महाकाय मगर आली तर तुम्ही काय कराल?

दररोज सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ ब्राझीलमधील असून, यात तलावात पोहणाऱ्या एका माणसाचा मगर पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. मगर मागे लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तो माणूनस किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात मगर त्याच्यावर मागून हल्ला करते. 

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे येथील लागो दा आमोर येथे शनिवारी ही घटना घडली. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, परंतु मगरींच्या उपस्थितीमुळे तेथे पोहण्यास मनाई आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की, पोहणाऱ्या व्यक्तीने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून तलावात पोहण्यासाठी गेला. पण, अखेर त्याला आपल्या चुकीची शिक्षा मिळालीच. 

घटना मोबाईलमध्ये कैदही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद करणार्‍या विलियन कॅटानोने दुपारी 4.40 च्या सुमारास त्या व्यक्तीला नदीत प्रवेश करताना पाहिले. काही वेळातच नदीच्या पलीकडे एक मगर वेगाने त्या व्यक्तीच्या दिशेने येताना दिसली. मगर येताना पाहून व्यक्तीने शक्य तितक्या वेगाने किनाऱ्यावर पोहण्याचा प्रयत्न केला. पण, किनाऱ्यावर येण्यापूर्वीच मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा हाताला जोराचा चावा घेतला. सुदैवाने मगरीच्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा जीव वाचला असला तरी, त्याच्या हाताला चावल्याची जखमी झाली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेनंतर स्थानिक लोक जखमी व्यक्तीभोवती जमा झाले आणि आपत्कालीन सेवेला कॉल केला. त्या व्यक्तीच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने यात त्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, या घटनेचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, 1.9 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर, 7800 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल