शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे 3 लाख मेट्रिक टन LPG 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये अडकले; सरकारने सांगितला एक्झिट प्लान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:57 IST

Crisis in Middle East: जहाजांच्या सुरक्षेसाठी सरकार काय प्रयत्न करतेय?

Crisis in Middle East: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये भारतीय ध्वज असलेली 22 जहाजे अडकल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजांमध्ये सुमारे 3 लाख मेट्रिक टन लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) असून, या जहाजांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकारकडून इराणसह संबंधित देशांशी चर्चा सुरू आहे.

सरकारची महत्वाची माहिती

शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, एकूण 22 भारतीय ध्वजधारक जहाजे होर्मुजमध्ये अडकली असून, त्यापैकी 6 LPG कॅरियर्स, 1 LNG टँकर, 4 क्रूड ऑइल टँकर्स आणि केमिकल कंटेनर जहाजांचाही समावेश आहे. यातील एका मोठ्या LPG जहाजामध्ये सुमारे 45,000 मेट्रिक टन गॅस वाहून नेली जाऊ शकते. त्यामुळे 6 जहाजांमध्ये मिळून अंदाजे 3 लाख मेट्रिक टन LPG आहे.

काही जहाजांची सुरक्षित सुटका

दरम्यान, दोन भारतीय LPG टँकर्स, ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ यांनी 14 मार्च रोजी सुरक्षितपणे होर्मुज पार करत भारतात आगमन केले. या जहाजांद्वारे सुमारे 92,700 मेट्रिक टन LPG भारतात पोहोचली. तसेच, ‘जग लाडकी’ नावाचा क्रूड ऑइल टँकरही यूएईतील फुजैराह येथून 81,000 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन भारताकडे रवाना झाला आहे.

इराणसोबत चर्चेला वेग

अडकलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी भारत सरकार इराणसह इतर देशांशी सातत्याने संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनीही स्पष्ट केले की, जहाज सुरक्षित परत येणे, ही सरकारची प्राथमिकता आहे आणि यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

‘जहाजांची अदलाबदल’ चर्चेचे खंडन

काही माध्यमांतून भारत आणि इराण यांच्यात जहाजांच्या अदलाबदलीबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, भारत सरकारने हे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत. सरकारने सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही.

युरोपियन संघातही चर्चेचा विषय

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यादरम्यानही ही परिस्थिती आणि ऊर्जा सुरक्षेवर चर्चा झाली. युरोपियन देशांनी या संकटावर संवाद आणि कूटनीतीद्वारे तोडगा काढण्यावर भर दिला असून, भारतानेही शांतता आणि स्थैर्याचे समर्थन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's LPG Cargo Stranded in Hormuz; Government Announces Exit Plan

Web Summary : Amidst Middle East tensions, 3 lakh metric tons of Indian LPG are stranded in the Strait of Hormuz. The government is in talks with Iran for safe passage, denying any 'exchange' deal. Some tankers safely reached India. Focus on diplomatic solutions is prioritized.
टॅग्स :Fuel Crisisइंधन टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारत