शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

ग्रीसचे संकट टळले

By admin | Updated: July 14, 2015 02:17 IST

कर्जाच्या विळख्यात अडकल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रीसला युरोझोनमधून न काढता नव्याने बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोपिअन युनियनमधील

ब्रुसेल्स : कर्जाच्या विळख्यात अडकल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रीसला युरोझोनमधून न काढता नव्याने बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोपिअन युनियनमधील नेत्यांचे एकमत झाले असल्याने ग्रीसवरील आणि पर्यायाने संभाव्य जागतिक मंदीचे संकट टळले आहे. ग्रीसचे डाव्या आघाडीचे पंतप्रधान अलेक्सिस सिपारस यांनी १७ तास चाललेल्या अटीतटीच्या चर्चेत कठोर सुधारणांना मान्यता दिली असून, त्याबदल्यात ८६ अब्ज युरोचे (९६ अब्ज डॉलरचे) कर्ज तीन वर्षाच्या काळाकरीता मिळाले आहे. २०१० पासून सरत्या पाच वर्षात तिसऱ्यांदा असे पॅकेज देण्यात आले आहे. ही कर्जरुपी मदत देताना ग्रीसला कठोर आर्थिक सुधारणा व आर्थिक मदतीच्या काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्याला पंतप्रधान सिपारस यांनी मान्यता दिली आहे. हे पॅकेज व आर्थिक सुधारणा ग्रीससाठी योग्य आहेत असे सिपारस यांनी म्हटले आहे. या सुधारणा एका आठवड्यापूर्वी झालेल्या सार्वमतात ग्रीक जनतेने नाकारल्या होत्या. आम्ही अखेरपर्यंत आमच्या हक्कासाठी लढलो, असे चर्चेनंतर बाहेर पडलेल्या सिपारस यांनी सुहास्य वदनाने सांगितले. हा करार कठोर आहे, पण बहुतांश ग्रीक नागरिक त्याला पाठिंबा देतील असा आशावादही सिपारस यांनी व्यक्त केला आहे. काटकसरीच्या कलासाठी आग्रही असणाऱ्या जर्मन नेत्या अँजेला मर्केल यांच्यामते ग्रीससाठी हा काळ आव्हानात्मक आहे, करार झाला, पण यश मिळेलच याची खात्री मात्र नाही. हा प्रवास कठीण आहे असे युरोपमधील सर्वाधिक प्रभावी नेत्या असणाऱ्या मर्केल यांनी म्हटले आहे. युरोमधील देशांना हा करार आपापल्या संसदेत मांडावा लागेल व मंजूर करून घ्यावा लागेल. तरच ग्रीसला अधिक मदत देणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रीसमधील जनतेने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधात मतदान केले होते. युरोपियन देशांचे बेलआऊट पॅकेज ग्रीसमधील जनतेने बहुमताने नाकारले होते. युरोपियन युनियनने घातलेल्या अटी नाकारून फेरवाटाघाटी करून काही अटी शिथिल करून घेण्यासाठीच त्यावेळी बेलआऊट पॅकेज नाकारण्यात आल्याची चर्चा होती. त्या पाशर््वभूमीवर युरोपियन युनियनमधील सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक ब्रुसेल्समध्ये झाली. त्यात नवे बेलआऊट पॅकेजवर चर्चा करण्यात आली. ज्याला सर्वांनी एकमताने सहमती दर्शविण्यात आली आहे.लवकरच बँका सुरू होणारग्रीक बँका गेले दोन आठवडे बंद असून , युरोपियन सेंट्रल बँकेकडून निधी न मिळाल्यास बँका निर्धन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर ग्रीसला युरोतून बाहेर पडावे लागले असते व स्वत:चे चलन सुरू करावे लागले असते. ग्रेक्झिटचा धोका टळला ग्रेक्झिट आता गेली आहे, असे युरोपियन आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर यांनी म्हटले आहे. ग्रीस जर युरो चलनातून बाहेर पडला असता तर युरोसाठी संकट ठरले असते व जागतिक अर्थव्यवस्था कोसळली असती. बुधवारपासूनच आर्थिक शिस्त ग्रीसला आता आर्थिक सुधारणांचे कठोर नियम बुधवार, दि. १५ जुलैपासून लागू करावे लागतील, कामगार सुधारणा व निवृत्तीवेतन, व्हॅट व कर आणि खाजगीकरणाचे उपाय असे या कराराचे फलित आहे. ग्रीसला नव्या कराराअंतर्गत ५० अब्ज युरो किमतीची मालमत्ता खाजगीकरणासाठी उपलब्ध करावी लागणार आहे. या पैशाचा खास निधी स्थापन केला जाईल व ग्रीसमधील बँकांना पुनर्भांडवल पुरवले जाईल.