शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Covid Booster Dose: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज नेमकी कुणाला? WHO च्या तज्ज्ञांनीच केली शिफारस, कारणंही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 9:21 PM

कोरोना विरोधी लसीचा बूस्टर डोस (Covid Booster Dose) देण्याच्या मागणीला आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.

कोरोना विरोधी लसीचा बूस्टर डोस (Covid Booster Dose) देण्याच्या मागणीला आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या लसीकरण सल्लागार पथकातील तज्ज्ञांनी ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशा व्यक्तींनी डब्ल्यूएचओकडून परवानगी मिळालेल्या लसीचा (Covid-19 Vaccine)  बूस्टर डोस द्यायला हवा, असा सल्ला दिला आहे. जभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विरोधातील लढ्यात वेगानं लसीकरण (Vaccination) केलं जात आहे. पण ठरावीक कालावधीनंतर लसीची परिणामकारकता कमी होत असल्याचीही प्रकरणं पुढे आली आहेत. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी लसीचा तिसऱ्या डोस देण्यास पाठिंबा दिला आहे. 

"मध्यम आणि गंभीर स्वरुपातील कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तांना कोरोना विरोधी लसीचा अतिरिक्त डोस देण्याची गरज आहे. कारण लसीकरणाच्या दोन डोसनंतरही अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढण्याची शक्यता कमी असते. याशिवाय अशा व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यताही अधिक असते", असं संयुक्त राष्ट्राच्या (United Nations)आरोग्य संस्थेच्या तज्ज्ञांच्या लसीकरण मोहिमेच्या रणनितीकार सल्लागार समूहानं म्हटलं आहे. 

CDCनंही केली तिसऱ्या डोसचं समर्थनसप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण संस्थेनं (CDC) देशातील लाखो ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या व्यक्तींना लसीचा तिसरा डोस दिला जाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तिसऱ्या डोससाठीचं महत्त्वपूर्ण पाऊल उचलून कोरोना संक्रमणाविरोधीतील अमेरिकेच्या लसीकरण मोहिमेचा नवा अध्याय सुरू केला जाऊ शकतो. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वालेन्स्की यांनी सल्लागार समितीनं केलेल्या शिफारसींच्या अहवालावर स्वाक्षरी देखील केली आहे. सल्लागारांनी दिलेल्या अहवालात ६५ वर्षांवरील अधिक वयोगटातील नागरिक, नर्सिंग होममध्ये राहणारे आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य संबंधी समस्याचा सामना करणाऱ्या ५० ते ६४ वयोगटातील नागरिकांना लसीचा तिसरा डोस देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 

बूस्टर डोससाठी जॉन्सन अँड जॉन्सन मागितली परवानगीजॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं गेल्याच आठवड्यात एफडीएकडे कंपनीच्या कोरोना विरोधी लसीचा तिसऱ्या डोस देण्यासाठीची परवानगी मागितली आहे. कारण अमेरिकन सरकारनं लाखो अमेरिकी नागरिकांना तिसरा डोस देण्याच्या मोहिमेलाही आता सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं एफडीएकडे शिफारस केली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्या