शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

पाकिस्तान मोठ्या अडचणीत! 'त्या' लग्नांमुळे संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 09:58 IST

पाकिस्तानातील संपूर्ण पिढी सापडतेय विळख्यात; परंपरा ठरतेय धोकादायक

इस्लामाबाद: भारताला कायम पाण्यात पाहणारा पाकिस्तान वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. नात्यांमध्ये होत असलेल्या विवाहांमुळे आनुवांशिक विकार होत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील बहुतांश भागांत नात्यांमध्येच विवाह केले जातात. पाकिस्तानमधील अनेक ख्यातनाम व्यक्ती, सेलिब्रिटींचे विवाहदेखील नात्यांमध्येच झाले आहेत. या विवाहांमुळे विविध प्रकारचे आनुवांशिक विकार होत असल्याची शास्त्रीय माहिती पुढे आली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास असलेल्या ५६ वर्षांचे गफूर हुसेन शाह पेशानं शिक्षक आहेत. त्यांना ८ मुलं आहेत. कबाइली रिवाजांनुसार ते त्यांच्या मुलांचे विवाह नात्यांमध्येच करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. मात्र अशा विवाहांमुळे काय होतं त्याचा प्रत्यय शाह यांना आला आहे. १९८७ मध्ये शाह यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. शाह यांच्या ३ मुलांना आनुवंशिक विकार आहेत. त्यांच्या एका मुलाच्या मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला नाही. एका मुलीला व्यवस्थित बोलता येत नाही. तर दुसऱ्या मुलीला ऐकण्यात अडचणी येतात.

पाकिस्तानातील जेनेटिक म्युटेशनवर आधारित एक अहवाल २०१७ मध्ये प्रसिद्ध झाला. नात्यांमध्ये होत असलेल्या विवाहांमुळे आनुवंशिक विकार वाढत असल्याचं या अहवालातून समोर आलं. आनुवंशिक विकारांसाठी जबाबदार असलेल्या म्युटेशन्सना ट्रॅक करून हा अहवाल तयार करण्यात आला. 

पाकिस्तानातील बहुतांश पालक त्यांच्या मुलांचे विवाह जवळच्या नातेवाईकांशी करून देतात. अशाच कुटुंबांमध्ये आनुवंशिक विकारांची संख्या जास्त असल्याचं डॉ. हुमा अशरद चिमा यांनी सांगितलं. देशातील ब्लड डिसऑर्डर थॅलेसेमिया बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आनुवंशिक आजारांची पडताळणी करणाऱ्या जेनेटिक टेस्टिंग आणि प्री नॅटल स्क्रीनिंगची संख्याही पाकिस्तानात कमी आहे. बहुतांश रुग्णालयांमध्ये यावरील उपचार उपलब्ध नाहीत.

नात्यांमध्ये विवाह कशासाठी?नात्यांमध्ये विवाह करणं इस्लामी परंपरांशी संबंधित असल्याचं कराचीतील आरोग्यतज्ज्ञ शिराज उद दौलाह यांनी सांगितलं. 'मी याबद्दल मौलवींशी संवाद साधला. त्यांना आनुवंशिक विकारांच्या वाढत्या प्रमाणाची माहिती दिली. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. चुलत किंवा मामे भाऊ/बहिणीशी विवाह केल्यानं आनुवंशिक आजारांची संख्या वाढत असल्याचं तुम्ही लोकांना सांगा, यासाठी मी त्यांना विनंती केली. मात्र मौलवींनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. असे विवाह इस्लामच्या शरिया कायदा आणि पैगंबर मोहम्मद यांच्या परंपरेनुसार होत असल्याचं त्यांनी सांगितलं,' अशा शब्दांत शिराज यांनी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यात आलेलं अपयश बोलून दाखवलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्न