शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दाम्पत्यानं धार्मिक स्थळावर बनवला शारीरिक संबंधांचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 09:56 IST

म्यानमारचं धार्मिक स्थळ असलेलं बागान जगभरात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक इथे येत असतात.

(प्रातिनिधिक फोटो)नायपिटाः म्यानमारचं धार्मिक स्थळ असलेलं बागान जगभरात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक इथे येत असतात. परंतु या धार्मिक स्थळावर एका जोडप्यानं शारीरिक संबंधांचा व्हिडीओ तयार केल्यानं खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हे, तर तो व्हिडीओ त्या दाम्पत्यानं पॉर्न साइटवर अपलोड केला असून, त्यानंतर गोंधळ उडाला आहे. आयएनएसच्या रिपोर्टनुसार, इटलीच्या दाम्पत्यानं म्यानमारच्या पवित्र स्थळ असलेल्या बागानमध्ये 12 मिनिटांचा शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्यानंतर हा चर्चेत असलेला व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ धार्मिक स्थळावर चित्रीत करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे या जोडप्यानं हे सगळं प्राचीन पॅगोड्यात रेकॉर्ड केलं आहे.  व्हिडीओसंदर्भात जेव्हा स्थानिकांना समजलं, त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिकांनी व्हिडीओ पाहिला आणि याची तक्रार करण्याची मागणी केली. रिपोर्टनुसार, बागानमधल्या एका नागरिकानं सांगितलं की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हाला फार दुःख झालं. धार्मिक इमारत आणि पॅगोड्यामध्ये संबंध प्रस्थापित करणं अनुचित आहे. त्यात आमचा धर्म, संस्कृती आणि इतिहासाचा अनमोल वारसा असलेल्या ठिकाणी हे सर्व करण्यात आलं आहे.  स्थानिक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, या धार्मिक स्थळावर स्थानिकांसह परदेशी नागरिकांना शॉर्ट्स किंवा तोकडे कपडे घालून फिरण्यास मनाई आहे. पॅगोडा, मंदिर आणि धार्मिक इमारतीत चुकीचे कपडे घालणं पूर्णतः प्रतिबंधित आहे. म्यानमारची धार्मिक इमारत आणि परिसरात उघड्यावर चुंबन घेण्यासही मज्जाव आहे. सोशल मीडियावरही लोक या प्रकरणात टीकात्मक प्रतिक्रिया देत आहे. नवव्या आणि 13व्या शताब्दी वर्षात जवळपास तीन हजार पगोडे आणि मंदिरं असलेल्या बागानला युनेस्कोद्वारे ऐतिहासिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.