शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Corruptions Perceptions Index: भारतात भ्रष्टाचार किती? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं जारी केला डेटा, पाकिस्तानचीही स्थिती पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 23:34 IST

India Corruption Perceptions Index 2021 : जगभरातील १८० देशांत होणाऱ्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेनं जारी केला डेटा.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2021  (Corruption Perceptions Index 2021) मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचारानं उच्चांकाची नवी पातळी गाठली असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. १८० देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान १६ स्थानांनी घसरून १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचा 'नया पाकिस्तान'चा नारा हा निव्वळ राजकीय जुमला होता हे यावरून दिसून येते. या निर्देशांकात २०२० प्रमाणे २०२१ मध्येही भारत ८५ व्या क्रमांकावर आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२१ मध्ये भारताचा स्कोअर ४० आहे, तर पाकिस्तानला फक्त २८ गुण देण्यात आले आहेत. निर्देशांकात डेन्मार्क ८८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

२०२० मध्ये करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये पाकिस्तानला ३१ गुण देण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तान या यादीत १२४ व्या स्थानावर होता. इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. २०१८ मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये या यादीत पाकिस्तानचा क्रमांक १२० वा होता. २०२० मध्ये पाकिस्तान चार स्थानांनी घसरून १२४ व्या स्थानावर आला. २०२१ मध्ये पाकिस्तानने 16 स्थानांनी घसरून १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, नवाझ शरीफ, शाहिद खाकान अब्बासी यांच्या कार्यकाळात पाकिस्तान ११७ व्या स्थानावर कायम होता.

भारताची स्थिती कशी?करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२१ मध्ये, भारत गेल्या वर्षीप्रमाणेच ४० गुणांसह ८५ व्या क्रमांकावर आहे. २०१३ पासून या निर्देशांकात भारताची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये भारताचे गुण ३८ होता. हा गुण २०१६ भारताला ४० गुण देण्यात आले आणि २०१७ मध्ये ही स्थिती कायम होती. त्यानंतर २०१८ मध्ये भारताला ४१ गुण देण्यात आले होते. परंतु २०२० मध्ये भारताचा एक गुण कमी करण्यात आला.

अन्य देशांची काय स्थिती?डेन्मार्क, न्यूझीलंड आणि फिनलंड प्रत्येकी ८८ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. नॉर्वे, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लक्झेंबर्ग आणि जर्मनी या देशांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले. ब्रिटन ७८ गुणांसह ११ व्या स्थानावर आहे. २०२० मध्ये अमेरिकेला ६७ गुण देण्यात आले होते. अमेरिकेला यावेळीही तितकेच गुण मिळाले. असं असलं तरी यादीत अमेरिकेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. कॅनडा ७४ गुणांसह १३ व्या स्थानावर आहे. दक्षिण सुदान ११ गुणांसह अखेरच्या स्थानी आहे, तर सोमालियाला १३, व्हेनेझुएलाला १४ आणि येमेन, उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तानला प्रत्येकी १६ गुण देण्यात आलेत.

गेल्या वर्षी कमी प्रयत्नट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात दावा केला आहे की, जगातील बहुतांश देशांनी गेल्या दशकात भ्रष्टाचाराची पातळी कमी करण्यात फारशी प्रगती केली नाही. या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोनाच्या जागतिक महासाथीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. केवळ प्रणालीगत भ्रष्टाचार आणि कमकुवत संस्था असलेल्या देशांमध्येच नव्हे तर प्रस्थापित लोकशाहीमध्येही अधिकार आणि नियंत्रण तथा संतुलनाची प्रणाली तेजीनं कमकुवत होत असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका