शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

इम्रान खान यांच्या 'नव्या पाकिस्ताना'त भ्रष्टाचार वाढला; पाहा भारत कोणत्या स्थानावर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 29, 2021 13:29 IST

'हा' ठरला जगातील सर्वात प्रामाणिक देश

ठळक मुद्देन्यूझीलंड ठरला सर्वात प्रामाणिक देशभारताचीही रँकिंगमध्ये घसरण

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे करप्शन इंडेक्सची नवी आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानातही भ्रष्टाचार वाढल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये एकूण १८० देशांचं रॅकिंग जारी करण्यात आलं आहे. यात भारत ८६ व्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे भारताचे शेजारी देश चीन ७८ व्या, पाकिस्तान १२४ व्या तर बांगलादेश १४६ व्या स्थानावर आहे. देशात भ्रष्टाचार संपवण्याचं आश्वासन देत सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानात भ्रष्टाचार वाढल्यानं पाकिस्तानातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. पाकिस्तानात भ्रष्ट्राचार वाढला असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. २०२० या वर्षात पाकिस्तान १२० व्या स्थानावर होता तर २०१९ मध्येही तेच स्थान होतं. परंतु आता पाकिस्तान १२४ व्या स्थावावर पोहोचला आहे. इतकंच नाही तर २०१८ शी तुलना केली तर इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान ७ क्रमांक खाली घसरला आहे, असं विरोधकांनी म्हटलं. तर दुसरीकडे बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीचे नेता शेरी रेहमान यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधत त्यांचे दावे खोटे असल्याचं म्हटलं. 

कर्जबाजारी पाकिस्तान जिन्नांची ओळख ठेवणार तारण; इम्रान खान घेणार ५०० अब्ज रूपयांचं कर्जहे आहेत सर्वात प्रमाणिक देशट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालात सर्वात प्रामाणिक देशांच्या यादीत पाच देशांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन या देशांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत व्हेनेझुएला, येमेन, सीरिया, सोमालिया आणि दक्षिण सूदान या देशांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकाही ६७ व्या क्रमांकावर आहे. भारत या यादीत ८६ व्या क्रमांकावर घसरला आहे. २०१९ मध्ये भारत हा ८० व्या क्रमांकावर होता. ज्या देशात भ्रष्टाचार कमी होता त्या ठिकाणी कोरोना विषाणूचा सामना अधिक चांगल्या पद्धतीनं केला गेला असल्याचंही यात समोर आलं आहे. दुसरीकडे न्यूझीलंड आणि डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असल्याची माहितीही या अहवालातून समोर आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानImran Khanइम्रान खानIndiaभारतNew Zealandन्यूझीलंडDenmarkडेन्मार्कBangladeshबांगलादेश