शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 08:26 IST

Coronavirus : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 26,047 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 613,886 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणत आहोत" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा सहा लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 2,228 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 613,886 झाली असून आतापर्यंत 26 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप

राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाDeathमृत्यू