शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : तुमची मुलं घरात कोरोना -कोरोना खेळतात ? - मग  सावधान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:18 IST

तुमची मुलं घरात काय खेळतात? मुलांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?

ठळक मुद्देकोरोना नावाचा पोरखेळ

तुमची मुलं नेमका घरात कुठला खेळ खेळतात याकडे जरा लक्ष द्या!आणि त्यावर रिअॅक्ट न होता, जरा शांतपणो त्या खेळाचा विचार करा!-असं बालमानसशास्त्र आणि बालकांचे खेळ याविषयातले तज्ज्ञ असलेले लोक तिकडे दूर अमेरिकेत वारंवार सांगत आहेत.त्याचं कारण अर्थातच कोरोना.एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरने लिहिलेली निनावी (अर्थात त्यामुळे फॅक्ट चेक करता आलं नाही) पोस्ट अलिकडेच अमेरिकेत व्हायरल झाली होती की, 4 वर्षाची एक मुलगी. तिच्या लहान दोन वर्षाच्या मुलीला येताजाता खोटंखोटं थर्मामिटर लावून तपासत असे. खेळण्यातला स्टेथोस्कोप लावून तपासत असे. खोटं खोटं औषध देत असे. एरव्हीही लहान मुलं डॉक्टर डॉक्टर खेळतात. मोठय़ांना टुचूक करतात. त्यांचं बीपी तपासतात. कारण त्यांनी डॉक्टरकाकांकडे हे सारं पाहिलेलं असतं.मात्र आता कोरोना लॉकडाऊन आणि त्यानं पसरलेलं भय, घरातल्या चर्चा, टीव्हीवरच्या बातम्या हे सतत पाहत आहेत. त्यामुळे ते ही कोरोना कोरोना खेळायला लागले आहेत. त्यातलीच ही एक मुलगी. ती सातआठ दिवस बहिणीला असं खोटं खोटं ( पण तिच्यामते तर खरंच) तपासत होती. आणि एक दिवस तिनं निदानही जाहीर केलं की बहिणीला कोरोना झाला आहे.तिनं आईबाबांना सांगूनही टाकलं की, नो बडी कॅन सेव्ह हर! आपली बहीण आता मरणार हे त्या मुलीच्या पक्कं डोक्यात बसलं होतं. इतकं की आपली बहीण जीवंत आहे, आपण सगळे घरात सुरक्षित आहोत यावरचा विश्वासच त्या चार वर्षाच्या मुलीनं गमावला.हे झालं एक टोकाचं उदाहरण. मात्र घरोघरची मुलं जगभरात घरबंद आहेत. बाहेर जाता येत नाही. मोकळ्या मैदानात खेळता येत नाही. त्यात त्यांचे मित्र भेटत नाहीत. शारीरिक ऊर्जाही त्यांची जिरत नाही.अमेरिकेच्याच वेस्टर्न रिव्हर्स युनिव्हर्सिटीत शिकण्याशिकवण्यातली प्राध्यापक सॅण्ट्रा रस. ती म्हणते, ‘खेळ ही लहान मुलांची भाषा आहे. ते प्रत्येक गोष्टीचा, अनुभवाचा खेळ करुन पाहतात. तो अनुभव ते स्वत: जगण्याचा प्रयत्न करतात. एरव्हीही वादळ, भूकंप, मोर्चे, ब्लास्ट, चोरपोलीस, मिनिस्टर मिनिस्टर हे खेळ मुलं खेळतात कारण ते विषय त्यांच्या कानावर पडतात. अमेरिकेत हुरीकेन येतात तेव्हाही अनेक मुलं तो खेळ खेळतात. त्यांचं खेळणं हा त्यांचा अनुभव, त्यांच्या विचारांचा निचरा, त्यातली गंमत हे सारं असतं. ते तेवढढय़ापुरतं खेळतात, त्यातून बाहेर पडतात तोवर ठीक आहे. मात्र तोच तो खेळ ते सतत खेळू लागले, आणि तो खेळ हेच वास्तव असं समजू लागले तर मात्र पालकांनी काळजी घ्यायला हवी. मुळात तिथवर गोष्टी जाणारच नाही, यासाठी सजग रहायला हवं. ते सजग रहायचं म्हणजे आपण सतत मुलांशी खेळायचं असं नव्हे, त्यांचं त्यांना खेळू देताना, ते काय खेळतात, याकडेही लक्ष दद्यायला हवी. त्यांच्या खेळाची भाषा समजून घ्यायला हवी!’

-मात्र सध्या हेच पालक करत नाही, िकंवा त्यांना जमत नाही. घरबंदपणामुळे पालक स्वत: असुरक्षित आहेत. रोजीरोटीचे प्रश्न आहेत. त्यात एक  भावनाही बळावते की, आता आपण घरीच आहेत, मुलांच्या सोबतच आहोत तर आपलं मुलांकडे लक्ष आहे. आपण त्यांना वेळ देतो आहे. वर्क फ्रॉम होम करणारे पालक तर सोडूनच दद्या पण ज्यांना सुटीच मिळाली आहे, ते पालकही मुलांशी खेळताना, किंवा क्वालिटी टाइम त्यांना देतांना दिसत नाहीत. ते शरीरानं घरात आहेत, मनानं मुलांसोबत नाहीत.’मुलांच्या खेळाचा कोरोना पोरखेळ  होऊ देणार नाही म्हणून पालकांनी डोळे उघडे ठेवायला हवे.