शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: वुहान हे कोरोना साथीचे उगमस्थान नाही; चीनचा धूर्त दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:53 IST

China Coronavirus Vuhan News: गेल्या वर्षअखेरीस अनेक देशांत संसर्ग

बीजिंग : कोरोना साथीचा उद्रेक जगातील विविध भागांत गेल्या वर्षाच्या अखेरीस झाला होता. मात्र, वुहान शहरातून ही साथ सुरू झालेली नाही असा दावा चीनने केला आहे.

चीनने म्हटले आहे की, विविध भागांमध्ये कोरोनाची साथ पसरली होती; पण या साथीचे अस्तित्व आम्ही सर्वात प्रथम जाहीर केले व ती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनेलाही प्रारंभ केला. वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू हवेत मिसळला व त्याची जगभर साथ पसरली असा अमेरिकेने केलेला आरोप बिनबुडाचा आहे, असेही चीनने म्हटले आहे.

चीनमधील बाजारामध्ये विक्रीसाठी असलेल्या वटवाघूळ किंवा खवल्या मांजरामधून कोरोनाचा विषाणू माणसांमध्ये संक्रमित झाला असाही आरोप करण्यात आला होता. त्यातही काही तथ्य नाही असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा नव्या प्रकारचा असून, त्याच्या संसर्गाचे नेमके काय परिणाम होतात याविषयाही संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोरोना विषाणूची साथ नेमकी कुठून सुरू झाली या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून होत आहे. त्या पक्षाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच कोरोना साथीने महाभयंकर रूप धारण केले असा आरोपही पॉम्पेओ यांनी केला. ते सर्व आरोप चीनने फेटाळून लावले आहेत. शास्त्रज्ञांची यादी चीनला पाठविलीकोरोना साथीचा उगम कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटना चौकशी करणार आहे. चौकशीसाठी शास्त्रज्ञांची यादी चीनला पाठविली जाईल. चीनच्या संमतीनंतर पथक चौकशीसाठी रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर चीनने धूर्तपणाची भूमिका घेतली आहे. जगभरात ३ कोटी ७१ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून, १० लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग