शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 7:56 AM

कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संक्रमितांची संख्याही वाढतीच आहे.कोरोनाचा अमेरिकेला मोठा फटका बसला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात ट्रम्प प्रशासनाला अद्याप यश मिळालेलं नाही.कोरोनानं अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले असून, अमेरिकी वैज्ञानिकांनीसुद्धा कोरोनावर लस निर्माण करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, संक्रमितांची संख्याही वाढतीच आहे. कोरोनाचा अमेरिकेला मोठा फटका बसला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात ट्रम्प प्रशासनाला अद्याप यश मिळालेलं नाही. कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कोरोनानं अमेरिकेत सर्वाधिक बळी गेले असून, अमेरिकी वैज्ञानिकांनीसुद्धा कोरोनावर लस निर्माण करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. कोरोनाच्या लसीच्या आम्ही एकदम जवळ आहोत. २०२० वर्ष संपण्यापूर्वीच कोरोना विषाणूवरची लस तयार करू, असा दावासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये कोरोनावर पत्रकारांना संबोधित केलं. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि चीनमधील लसींच्या चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले असता, 'आम्ही लसीच्या अगदी जवळ आहोत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. आमच्याकडे लस निर्माण करण्यासाठी कार्यकुशल आणि हुशार वैज्ञानिक आहेत. आम्ही सध्या प्रयोगाच्या अगदी जवळ नाही, कारण जेव्हा प्रयोग केला जातो, त्यास थोडा वेळ लागतो, परंतु आम्ही तो प्रयोग पूर्ण करून लवकरच कोरोनावरची लस तयार करू, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेला उपराष्ट्रपती माइक पेन्स आणि व्हाइट हाऊस कोरोना व्हायरस टास्कफोर्सचे समन्वयक डेबोराह बार्क्स उपस्थित होते. अमेरिकन सरकारमधील संसर्ग रोगतज्ज्ञ डॉ. अँथोनी फाउसी म्हणतात की, व्यापक वापरासाठी लस तयार होण्यास 12 ते 18 महिने लागतील. त्यानंतर अध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसविरुद्ध अमेरिकेच्या लढाईत डेटाच्या माध्यमातून प्रगतीची चिन्हे आहेत. न्यूयॉर्क मेट्रो एरिया, न्यू जर्सी, कनेक्टिकट, डेट्रॉइट आणि न्यू ऑर्लियन्स या शहरांसह कोरोना हॉटस्पॉट्समध्ये देखील या साथीच्या आजारानं हाहाकार माजवला आहे, असंही पेन्स म्हणाले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्या