शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ना अमेरिका, ना ब्रिटन; 'या' देशानं घेतली आघाडी, महिना अखेरपासून लसीकरणाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 09:17 IST

CoronaVirus News: ऑगस्टच्या अखेरपासून लसीकरण करण्याचा विचार; डॉक्टर, शिक्षकांना लस देण्यात येणार

मॉस्को: जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८० लाखांच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा सात लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता अवघ्या जगाचं लक्ष लसीकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक असल्यानं अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच आता रशियानं थेट सार्वजनिक लसीकरणाची तयारी सुरू केली. ऑगस्टच्या अखेरीस डॉक्टर आणि शिक्षकांना कोरोनाची लस देण्याचा विचार रशियन सरकारकडून सुरू आहे. रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी याबद्दल विधान केलं आहे. मॉस्कोतल्या गमालेया संशोधन संस्थेनं कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या असून त्यासाठी आवश्यक नोंदणीचं काम सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. 'गमालेया संस्थेनं तयार केलेल्या कोरोनावरील लसीनं चाचण्या पूर्ण केल्या आहेत,' अशी माहिती आरोग्यमंत्री मुकाश्को यांनी पत्रकारांनी दिल्याचं वृत्त स्पुटनिक या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. ऑक्टोबरमध्ये देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येईल, असं मुकाश्को म्हणाले. 'सध्या अनेकांवर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. या चाचणीचे निष्कर्ष उत्सावर्धक आहेत,' असंदेखील त्यांनी म्हटलं. आरोग्य मंत्र्यांच्या विधानाप्रमाणे रशियानं खरोखरच सार्वजनिक लसीकरण सुरू केल्यास तसं करणारा तो जगातला पहिला देश ठरेल.१० ते १२ ऑगस्ट दरम्यान कोरोना लसीची नोंदणी करणार असल्याचं रशियानं याआधी सांगितलं होतं. तशा प्रकारची नोंदणी झाल्यास ती जगातली कोरोनावरील पहिली लस ठरेल. कोरोना बाधितांच्या संख्येत रशिया जगात चौथ्या स्थानी आहे. रशियातील कोरोना रुग्णांचा आकडा ८ लाख ४५ हजार ४४३ वर पोहोचली आहे. रशियात आतापर्यंत कोरोनामुळे १४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या