शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...तर एका वर्षात तयार होऊ शकते कोरोनाची लस, बिल गेट्स यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 23:53 IST

गेट्स सध्या कोरोना व्हायरसवरील लसीवर काम करत असलेल्या सात प्रोजेक्ट्सना फंडिंग करत आहेत. त्यांनी भारताचेही कौतुक केले आहे.

ठळक मुद्देडॉ. अँथोनी फॉसी यांनी अंदाज लावला आहे, की या लसीसाठी 18 महिने लागू शकतातगेट्स कोरोना व्हायरसवरील लसीवर काम करत असलेल्या सात प्रोजेक्ट्सना फंडिंग करत आहेतगेट्स यांनी भारताचेही केले आहे कौतुक

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे  सह संस्थापक बिल गेट्स यांनी मोठा दावा केला आहे. जर सर्वकाही योजनेप्रमाणे सुरू राहीले, तर कोरोना व्हायरसवरील लस एका वर्षात जगासमोर येऊ शकते, असे गेट्स यांनी म्हटले आहे. सध्या, गेट्स कोरोना व्हायरसवरील लसीवर काम करत असलेल्या सात प्रोजेक्ट्सना फंडिंग करत आहेत.  

गेट्स म्हणाले, 'जर सर्वकाही योजनेनुसार सुरू राहिले, तर आम्ही एका वर्षाच्या आत लसीचे उत्पादन सुरू करू शकतो. याला फार तर दोन वर्षे लागू शकतात. जसेकी, काही लोक म्हणत आहेत, मला नाही वाटत सप्टेंबरपर्यंत लस तयार होऊ शकेल, असेही गेट्स म्हणाले.  

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

'डॉ. अँथोनी फॉसी यांनी अंदाज लावला आहे, की यासाठी 18 महिने लागू शकतात. जे फार अधिक नाहीत,' असेही गेट्स म्हणाले. डॉ. फॉसी हे व्हाइट हाऊसमधील कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य आहेत आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शिअस डिसीजचे संचालक आहेत. 

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

गेट्स यांनी भारताचेही केले आहे कौतुक -गेट्स यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले होते. यात गेट्स म्हणाले होते, कोरोनाविरुद्धच्या युद्धात तुम्ही आणि तुमच्या सरकारने वेळेत, ज्या प्रकारे महत्त्वाची पावले उचलली आहेत, ती कौतुकास्पद आहेत.  कोरोनाच्या युद्धात भारताने आपल्या डिजिटल शक्तीचा पुरेपूर उपयोग केला आहे आणि मला त्याचा  अधिक आनंद आला आहे, असे गेट्स यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले. आरोग्य सेतू मोबाइल अॅप सरकारने सुरू केले असून, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आपण कोरोनाग्रस्त असलेला परिसर किती सुरक्षित आहे हे सहज शोधू शकतो.

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBill Gatesबिल गेटसAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिका