शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनामागे अमेरिका?; वुहानमधल्या 'त्या' लॅबला ३.७ मिलियन डॉलर्स दिल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 08:50 IST

Coronavirus वुहानमधल्या प्रयोगशाळेचं अमेरिकन कनेक्शन समोर आल्यानं खळबळ

वॉशिंग्टन: चीनमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून त्याचा फटका जवळपास सगळ्याच देशांना बसला आहे. अमेरिकेनं सुरुवातील कोरोनासाठी थेट चीनला जबाबदार धरलं होतं. मात्र आता चीनच्या वुहानमधल्या प्रयोगशाळेला अमेरिकेनंच कोट्यवधींचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. युन्नात प्रांतातल्या गुहांमध्ये असलेल्या वटवाघळांमुळे कोरोना पसरल्याचा संशय आहे. याच गुहेतल्या वटवाघळांवर संशोधन करण्यासाठी अमेरिकेनं वुहानमधल्या प्रयोगशाळेला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं उघड झालं आहे.युन्नानमध्ये असलेल्या सस्तन प्राण्यांवर वुहान विषाणूशास्त्र संस्थेनं प्रयोग केले. यातूनच पुढे कोरोनाचा विषाणू पसरल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सरकारनं वुहानमधल्या प्रयोगशाळेला संशोधनासाठी ३.७ मिलियन अमेरिकन डॉलर्सचं अनुदान दिलं होतं. कोरोनाचा विषाणू वुहानमधल्या मांस बाजारातून परसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर मात्र कोरोनाचा संबंध युन्नानमधल्या गुहांमध्ये असल्याची माहिती समोर आली.वुहानमधल्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात या प्रयोगशाळेला अमेरिकन सरकारच निधी पुरवत असल्यानं अमेरिकन संसदेचे सदस्य आणि दबाव गटांनी सरकारला धारेवर धरलं. वुहानमध्ये प्राण्यांवर सुरू असलेल्या क्रूर आणि गंभीर प्रयोगांसाठी अमेरिकन सरकार पैसा पुरवतं हे अतिशय धक्कादायक असल्याचं अमेरिकन संसदेचे सदस्य मॅट गॅट्स यांनी म्हटलं. व्हाईट कोट वेस्ट या अमेरिकन दबाव गटाचे अध्यक्ष अँथॉनी बेल्लोट्टी यांनीदेखील अमेरिकन सरकारवर कठोर शब्दांत आसूड ओढले. अमेरिकन सरकार नागरिकांचा कररुपी पैसा चीनमध्ये अशा प्रयोगांसाठी वापरतं हे निषेधार्ह आहे. विषाणू असलेले प्राणी प्रयोग केल्यानंतर वुहानमधल्या मांस बाजारात विकले जात असावेत. त्यातूनच त्या विषाणूंचा फैलाव झाला असावा, असं बेल्लोट्टी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिका