शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 06:40 IST

कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिका व इंग्लंड करत आहे.

वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिकाइंग्लंड करत आहे.अमेरिकेतील लस यंदा वर्षअखेर किंवा त्याच्याही आधी उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले होते. इंग्लंडमध्येही लस विकसित करण्यासाठी प्रयोग सुरू असून, ती लस परिणामकारक व सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यास सार्वत्रिक वापरासाठी तिला तत्काळ मान्यता देण्यात येईल. त्यासाठी लसीच्या वापरासंदर्भातील कायदे बदलण्याचाही विचार करत आहे. इंग्लंडमध्ये येत्या आॅक्टोबर महिन्यातच लस जनतेच्या वापरासाठी उपलब्ध होईल.लसीचे दुष्परिणाम दिसून आलेच तर कायद्यात केलेल्या बदलांमुळे उत्पादक कंपन्यांवर नुकसान भरपाईचे खटले कोणीही करू शकणार नाही. संशोधन करणाऱ्या कंपन्यांनी लस पुढील वर्षीच उपलब्ध होईल असेच आजवर जाहीर केले आहे.ही लस बाजारात काही महिन्यांत उपलब्ध करून देऊ, असे सांगणारे डोनाल्ड ट्रम्प आता या वर्षाच्या अखेरीस किंवा त्याही आधी ही लस उपलब्ध होईल, असे म्हणू लागले आहेत. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ती डोळ्यासमोर ठेवूनही डोनाल्ड ट्रम्प वक्तव्ये करीत आहेत. जनतेला अशा लसीची आशा दाखविल्यास ते आपल्याला पाठिंबा देतील, अशी ट्रम्प यांची अटकळ आहे.कोरोना प्रतिबंधक लसींसंदर्भात जेवढे प्रयोग सुरू आहेत, त्यातील एक तरी लस परिणामकारक आहे हे सिद्ध झाल्यासच अमेरिका, इंग्लंडचे जनतेला लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याचे ध्येय प्रत्यक्षात येईल.‘समन्यायी पद्धतीने वितरण करा’अमेरिकेतील सेंटर्स आॅफ डिसिजेस कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसीपी) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी म्हटले आहे की, जरी ही लस पुढच्या वर्षीपर्यंत तयार झाली तरी पहिले काही महिने याचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा असेल. या लसीचे वितरण समन्यायी पद्धतीने होणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited StatesअमेरिकाEnglandइंग्लंड