शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : धक्कादायक! वुहानमधल्या कोरोनाच्या प्रकोपाची माहिती उघड करणारे तीन पत्रकार गायब; चीनही चिडीचूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 13:29 IST

विशेष म्हणजे चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं उघड करणारे तीन पत्रकार आता गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत.

बीजिंग- जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक देशांनी आता ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या वुहानमध्ये या कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू असल्याचं अमेरिकेनं वारंवार सांगितलं आहे. चीननं कोरोनासंदर्भातील माहिती जगापासून लपवल्याचाही आरोप अमेरिकेनं केला आहे. विशेष म्हणजे चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं उघड करणारे तीन पत्रकार आता गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत.चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ या तिन्ही पत्रकारांनी चीनमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. तिघांनीही सोशल मीडियाची प्रभावी माध्यमं असलेल्या यू ट्युब आणि ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याची माहिती जगासमोर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतरच हे तिन्ही पत्रकार रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.३४ वर्षांचे चेन हे ६ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजल्यापासून गायब झाले आहेत. वुहानमधल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपाची माहिती उघड करणारे चेन ६८ दिवसांपासून गायब आहेत. कृपया त्यांना वाचवा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. फेंग बिंग यांनी ९ फेब्रुवारीला सोशल मीडियावर काही व्हिडीओ टाकल्यापासून ते गायब झाले आहेत. फेंग यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये वुहानमध्ये कोरोनानं मृत्युमुखी पडलेले मृतदेह पाहायला मिळत होते. गायब होण्यापूर्वी त्यांना चीनच्या सरकारनं अटकही केली होती. काही अधिकारी त्यांच्या शरीराचं तापमान तपासण्याच्या बहाण्यानं आले आणि त्यांना घेऊन गेले. तेव्हापासून ते परतलेच नाहीत. तर २५ वर्षीय ली जहुआ हेसुद्धा चीनमधले जाणकार पत्रकार आहेत. चीनमधल्या एका वृत्तवाहिनीसाठी ते काम करत होते. त्यांना शेवटचं २६ फेब्रुवारीला पाहण्यात आलं, त्यानंतर ते गायबच आहेत. वुहानमध्ये ज्या भागात कोरोनाच्या प्रभाव सर्वाधिक होता, त्या भागांवरून या पत्रकारांनी ग्राऊंड रिपोर्टसुद्धा केला होता. तिथली सगळी परिस्थिती या पत्रकारांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी चिनी सरकारकडे ही आपत्ती जगासमोर उघड करण्याची मागणी केली होती. चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ हे तिन्ही चिनी नागरिक होते. त्यांनी कोरोना व्हायरस पसरत असलेल्या घटनास्थळी जाऊन वृत्तांकन केलं होतं. त्यांना या साथीच्या रोगाबद्दल सोशल मीडियावर वाचत्या केल्यानं शिक्षा झाल्याची  आता चर्चा आहे. विशेष म्हणजे हे पत्रकार गायब असतानाही चीननं त्यांच्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या