शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : Pfizer प्रमुख म्हणतात, "१२ महिन्यांत लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 11:57 IST

Coronavirus Vaccine : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वार्षिक लसीकरणाची आवश्यकता असल्याचं व्यक्त केलं मत.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वार्षिक लसीकरणाची आवश्यकता असल्याचं व्यक्त केलं मत.लसीपासून किती काळासाठी संरक्षण मिळतं हा संशोधनाचा विषय : Pfizer प्रमुख

सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाची सुरू झालेली महासाथ अद्यापही कायम आहे. आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतासह काही देशांनी लसही विकसित केली आहे. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही लस किती काळासाठी कोरोनापासून संरक्षण करू शकते याबाबत अद्यापही संशोधन सुरू आहे. Pfizer प्रमुखांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलं असून लसीकरणाच्या १२ महिन्यांच्या आत त्यांच्या कंपनीच्या लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासू शकते, असं मत Pfizer चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी व्यक्त केलं. "कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपल्याला वार्षिक लसीकरणाची गरज भासू शकते. याचा क्रम काय असेल आणि ते तसं किती वेळा करावं लागेल याची अद्याप माहिती घेणं बाकी आहे," असं बोरला म्हणाले. सीएनबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता भासेल अशी शक्यता आहे. हा कालावधी ६ महिने किंवा १२ महिन्यांच्या मध्ये असू शकतो. त्यानंतर वार्षिक लसीकरणाचीही गरज भासू शकेल. परंतु या सर्व बाबींची पुष्टी होणं बाकी आहे," असंही त्यांनी नमूद केलं.सध्या ही लस किती काळापर्यंत कोरोना विषाणूपासून रक्षण करू शकेल याचा शोध घेण्याचं काम संशोधकांकडून सुरू आहे. Pfizer नं या महिन्याच्या सुरूवातीला एक अहवाल प्रकाशित केला होता. यामध्ये ही लस ९१ टक्के प्रभावी ठरू शकते असा दावा करण्यात आला होता. तसंच दुसऱ्या डोसनंतर गंभीर प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपर्यंत ही लस ९५ टक्के प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, सहा महिन्यांनंतर ही लस प्रभावी ठरेल की नाही हा संशोधनाचा विषय असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका