शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: विषाणू उन्हात फार काळ टिकत नाही; अमेरिकन संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:58 IST

एक ते दीड मिनिटच तग धरु शकतो

वॉशिंग्टन : कोरोना विषाणू उन्हामधे फारतर एक ते दीड मिनिटच तग धरु शकतो असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. फ्लू साथीसारखा कोरोना उन्हाळ्यात फार प्रसार पावणार नाही, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, या संशोधनाला आणखी पुष्टी देण्यासाठी काही चाचण्या करण्यात येणार असून, त्यावर तज्ज्ञांची मते देखील जाणून घेतली जातील. त्या नंतरच संशोधन अहवाल सर्वांसाठी खुला केला जाणार आहे.कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. औषध कंपन्यांसर विविध संशोधकही विषाणूला जाणून घेण्यासाठी अनेक प्रयोग करीत आहेत. अमेरिकेतील होमलँड सेक्युरिटीचे सचिव विल्यम ब्रायन म्हणाले, अल्ट्राव्हॉयलेट किरणांचा कोरोनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उन्हामधे त्याचा प्रसार फारसा वेगाने होणार नाही. सौर किरणांमुळे हवेतील आणि जमिनीवर अथवा रस्त्यावर पडलेले विषाणू देखील फारकाळ तग धरु शकत नाही. केवळ तापमानच नाही तर आद्रता देखील वाढल्यास विषाणू तगून राहण्याचा कालावधी कमी होत आहे. अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे विषाणूचे संरक्षक आवरण कमकुवत होते. तसेच, स्वत:ची संख्या वाढविण्याची त्याची क्षमता नष्ट होते.टेक्सास विद्यापीठातील जैवशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख बेंजामिन न्युमन म्हणाले, कोरोनावर सौर किरणांचा आणि आद्रतेचा होणारा प्रभाव तपासण्यासाठी त्यांनी नक्की चाचणी कशी केली, त्याचे परिणाम कसे मोजले हे पहावे लागेल.ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा विचार केल्यास तेथे बाधितांची संख्या ७ हजार असून, ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तरेकडील थंड प्रदेशामधे हवेमधे विषाणू अधिक काळ राहण्याचे प्रमाण जास्त आहे. उष्ण तापमानात विषाणूचे संरक्षक कवच तुलनेने लवकर नष्ट होत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात बाधितांची संख्या घटेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.तापमान २१ ते २४ सेल्सिअस असल्यास आणि जमीन अथवा किठीण वस्तूची आद्रता २० टक्के असल्यास विषाणूचे अर्ध आयुष्य १८ तासावर खाली येते. आद्रता ८० टक्के झाल्यास अर्ध आयुष्य ६ तासांवर खाली येते. सौरतापमानात तर एक ते दीड मिनिटेच विषाणू तग राहू शकतो. उन्हाळ्यासारखे वातावरण तयार करुन विषाणूवर होणारा परिणाम आम्ही तपासला. मात्र, याचा अर्थ असा नाही की उन्हामुळे पूर्णपणे विषाणूचा नायनाट होईल. नागरिकांना कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना या पाळाव्याच लागतील.- विल्यम ब्रायन,सचिव, होमलँड सेक्युरिटी, अमेरिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या