शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Coronavirus: 4 मे रोजी संपणारा लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला; सिंगापूर सरकारचं सावध पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 18:24 IST

सिंगापूर सरकारने लॉकडाऊन 1 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सिंगापूरः कोरोना विषाणूनं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. तरीसुद्धा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना शक्य झालेलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर सिंगापूरमधील लॉकडाऊन पुढील चार आठवड्यांसाठी वाढविण्यात आले आहे. सिंगापूर सरकारने लॉकडाऊन 1 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. मंगळवारी सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.सिंगापूरमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर तिथलं सरकार लागलीच सक्रिय झालं होतं. सरकारने तातडीने शाळा व इतर कामे सुरू असलेली ठिकाणं बंद केली होती. त्यामुळे सिंगापूरमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला नाही.  2 आठवड्यांपूर्वी लादलेला लॉकडाऊन 4 मे रोजी संपणार होता. परंतु आता सिंगापूर सरकारनं तो 1 जूनपर्यंत वाढविला आहे.द गार्डियनच्या वृत्तानुसार, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने संसर्गाची ताजी माहिती जाहीर केल्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची 1,111 नवीन प्रकरणे समोर आली असून, संक्रमितांची संख्या वाढून 9,125वर पोहोचली आहे. कोरोना संक्रमित नवे रुग्ण हे वसतिगृहात राहणा-या स्थलांतरित मजुरांमध्ये आढळले आहेत. आम्हाला प्रवासी मजुरांवर विश्वास असल्याचंही सिंगापूर सरकारनं स्पष्ट केलं आहे.सिंगापूरमध्ये मोठ्या संख्येने बांधकाम मजूर आशियाई देशांमधून येतात. सिंगापूरच्या बांधकाम क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडच्या काळात कामगारांच्या राहत्या वसतिगृहात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळात येथे काही डझनभर मजुरांना संसर्ग झाल्याची नोंद होती. गेल्या आठवड्यात त्यांची संख्या शेकडोंवर गेली आहे. सिंगापूरमध्ये सलग दोन दिवस संक्रमितांची नवी प्रकरणे हजारांच्या पुढे जात आहेत. आग्नेय आशियातील देशांमधील सिंगापूरमध्ये कोरोना संक्रमितांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsingaporeसिंगापूर