शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रशिया, पाकिस्तानमध्ये एका दिवसात रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:42 IST

आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण । निर्बंधांचे नीट पालन होण्याची गरज

मॉस्को/इस्लामाबाद : जगातील काही देश लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना रशिया व पाकिस्तानमध्ये शुक्रवारी एका दिवसात ‘कोविड-१९’ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

रशियामध्ये शुक्रवारी एका दिवसात ९,६३३ तर पाकिस्तानमध्ये १,२९७ रुग्ण आढळून आले. रशियामध्ये आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख २४ हजारहून अधिक झाली आहे. तर तिथे बळींची संख्या सव्वा हजारावर पोहोचली आहे. याच गतीने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत राहिली तर त्या देशातील रुग्णालयांवर मोठा ताण येणार आहे. रशियामध्ये काही दिवसांत वैद्यकीय साधनांचा तुटवडाही जाणवू लागण्याची शक्यता आहे. नजिकच्या काळातील हे संकट दिसत असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचे ठरविले आहे. रशियात अन्य दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढली. या देशात रुग्णांपैकी सुमारे १५ हजार जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी १,२९७ नवे रुग्ण आढळून आल्याचे तेथील सरकारने सांगितले. त्यामुळे तेथील एकूण रुग्णांची संख्या १८ हजारवर गेली आहे. शुक्रवारी पाकिस्तानमध्ये ९ हजार लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात अनेक नवे रुग्ण आढळले असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानातदररोज वीस हजार लोकांच्या चाचण्या करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे असेही ते म्हणाले.फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरापाकिस्तानमधील लोक फिजिकल डिस्टन्सिंगची बंधने कमी प्रमाणात पाळताना दिसत आहेत. या देशात ठिकठिकाणच्या प्रार्थनास्थळांमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या