शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रशियाचे अजून एक पाऊल पुढे, ऑगस्टच्या मध्यापर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करणार कोविड-१९ वरील लस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 11:55 IST

काही दिवसांपूर्वीच कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा केल्यानंतर आता रशियाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठळक मुद्देऑगस्टच्या मध्यापर्यंत लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी रशियाने केली आहेरशियन सरकार दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत जगातील सर्वात पहिल्या कोरोनावरील लसीला मंजुरी देऊ शकतेही लस मॉस्कोमधील गमलेया इंस्टिट्युटने विकसित केली आहे

नवी दिल्ली/मॉस्को - संपूर्ण जग कोरोना  विषाणूविरोधात संपूर्ण जग लढत असतानाच काही ठिकाणांवरून कोरोनाविरोधातील लढ्याला बळ देणाऱ्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा केल्यानंतर आता रशियाने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोनाविरोधातील लसीची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर आता ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याची  तयारी रशियाने केली आहे.

रशियन सरकार दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत जगातील सर्वात पहिल्या कोरोनावरील लसीला मंजुरी देऊ शकते. ही माहिती सीएनएनने आपल्या वृत्तात दिली आहे. या लसीबाबत रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. की, कोरोनावरील लसीला मंजुरी देण्यासाठी १० ऑगस्ट किंवा त्यापूर्वीच्या तारखेवर काम करण्यात येत आहे. ही लस मॉस्कोमधील गमलेया इंस्टिट्युटने विकसित केली आहे.

आता ही लस सर्वसामान्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगिले. तसेच ही लस सर्वप्रथम फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्सना देण्यात येईल. रशियाने कोरोनावरील लस विकसित केल्याचा दावा केला असला तरी या लसीबाबतचा कुठलाही डेटा प्रसिद्ध केलेले नाही. त्यामुळे या लसीच्या उपयुक्ततेबाबत कुठल्याही प्रकारचे विधान करता येणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे.  

कोरोनावरील लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी रशियामध्ये राजकीय दबाव आणण्यात येत असून, रशियाला संशोधनक्षेत्रातील शक्ती म्हणून पुढे आणण्यासाठी राजकीय नेतृत्व उत्सुक आहे. दरम्यान, रशियात विकसित करण्यात आलेल्या लसीच्या अपूर्ण चाचण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनावरील शेकडो लसींवरील चाचणी सध्या जगभरात चालू आहे. काही देशांमधील चाचण्या ह्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र रशियामधील लसीचा दुसरा टप्पा पार होणेही अद्याप बाकी आहे. दरम्यान, लस विकसित करणाऱ्यांनी ३ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होईल.

 कोरोनावरील लस लवकर विकसित करण्यात यश मिळाले कारण ही लस अशा प्रकारच्या आजारांशी लडण्यात आधीपासून सक्षम होती, अशा दावा संशोधकांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाmedicinesऔषधंInternationalआंतरराष्ट्रीय