शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: तोंडाला मास्क लावण्याच्या नियमाची न्यूयॉर्कमध्ये ऐशीतैशी, प्रत्येक जण काढतो सोयीचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 06:24 IST

सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे.

न्यूयॉर्क : एखादा केलेला नियम न पाळणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. त्यात त्यांना काय भूषण वाटते ते कळत नाही. अमेरिकेमध्ये कोरोना साथीचा सर्वांत जास्त तडाखा बसलेल्या व २० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेलेल्या न्यूयॉर्क शहरात असे बरेच दीडशहाणे आहेत की, जे घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावत नाहीत. हा उपाय आपला जीव वाचविण्यासाठी महत्त्वाचा आहे हे माहिती असूनही ते बेजबाबदारपणे वागत आहेत.सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे. एरिक लेवेनथाल (३६ वर्षे) हे तोंडाला मास्क न बांधता न्यूयॉर्कमधील एका मोकळ्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी चालले होते. तेवढ्यात समोरून एक वृद्ध बाई आल्या. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्या बाईने एरिककडे बघितले व नापसंतीचा भाव दर्शवत मान हलविली. एरिकने मास्क न लावल्याने त्या बाई नाराज झाल्या होत्या. हा प्रसंग एरिकनेच मोठ्या अभिमानाने सांगितला.कोरोनाच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव रोखण्याकरिता फिजिकल डिस्टन्सिंगसाठी न्यूयॉर्कमध्ये प्रत्येकाने दुसºया व्यक्तीपासून किमान ६ फूट अंतर राखले पाहिजे, असा नियम आहे. मात्र त्यातून मुले व आजारी माणसांना वगळण्यात आले आहे. तोंडाला मास्क लावण्याच्या नियमाचा स्वत:ला सोयीस्कर असा अर्थ न्यूयॉर्कच्या रहिवाशांनी लावला आहे. उद्यानांत जाणारी माणसे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीसही तोंडाला लावलेले मास्क बेलाशक काढून गप्पा मारत उभे असलेले दिसून येतात.न्यूयॉर्कमधील कोरोनाची साथ उतरणीला लागेल तसतसे निर्बंध शिथील होत जाऊन लोक अधिक संख्येने घराबाहेर पडतील. अशा वेळी तोंडाला मास्क बांधणारे व न बांधणारे यांच्यात वादावादीचे प्रसंग वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Statesअमेरिका