शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अमेरिकेत संसर्ग वाढल्याने दोन प्रांतांत पुन्हा निर्बंध; बार बंद करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:19 IST

विविध प्रांतांत काही निर्बंध लागू करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ते शिथिल केले जात आहेत.

ऑस्टिन : अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून, एका दिवसात तब्बल ४० हजार नवे रुग्ण आढळल्याने तेथील दोन प्रांतांमध्ये काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टेक्सासच्या गव्हर्नरनी सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर फ्लोरिडामधील रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली आहे.

रेस्टॉरंट व बारमध्ये अनेक तरुण गर्दी करीत असून, ते मास्क अजिबात वापरत नाहीत आणि फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत, असे दिसून आले आहे. तरुणांमध्येच कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असून, त्याची हीच कारणे असावीत, असे जाणवल्याने टेक्सासमध्ये बार बंद करण्याचा आणि फ्लोरिडामध्ये मद्यविक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे तेथील प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी सांगितले की, रेस्टॉरंटची क्षमता कमी करण्याचे ठरविले आहे. तसेच १०० हून अधिक लोक उपस्थित राहणार असतील, अशा समारंभाला यापुढे प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. काय समारंभ आहे, कोण लोक येणार, त्यात वृद्ध, महिला, लहान मुले किती असतील, त्यांना कोणते आजार होते वा आहेत का आणि अशा मंडळींनी समारंभास उपस्थित राहण्याची गरज आहे का, हे तपासले जाईल. तसेच समारंभाचे ठिकाण आणि समारंभात होणारे कार्यक्रम यांची माहितीही संबंधितांना आधी द्यावी लागेल.फ्लोरिडाच्या मियामी दादे कौंटीचे मेयर कार्लस जिमेनिझ म्हणाले, आम्ही समुद्रकिनारे काही काळ बंद ठेवण्याचे ठरविले आहे. तरुणांमध्येच कोरोनाची अधिक लागण होत असल्याचे दिसून आल्यामुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध आणले आहेत.परिस्थितीत सुधारणाविविध प्रांतांत काही निर्बंध लागू करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ते शिथिल केले जात आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, दोन महिन्यांपूर्वी जी परिस्थिती देशात होती, त्यात आता खूपच सुधारणा झाली आहे. रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अमेरिकेच्या मृत्युदरातही घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका