शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचे जगातील एकचतुर्थांश मृत्यू झाले एकट्या अमेरिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 06:30 IST

देशातील ९ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शनिवारपर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर पोहचली आहे.

वॉशिंग्टन : जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांपैकी एकचतुर्थांश मृत्यू हे एकट्या अमेरिकेत झाले आहेत. तसेच, संसर्गाचे एक तृतियांश रुग्णही अमेरिकेत आहेत. चीनच्या वुहान शहरातून नोव्हेंबरमध्ये कोरोनाची साथ सुरु झाली होती. जगात आतापर्यंत जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २७ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. ‘जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठा’च्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. देशातील ९ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शनिवारपर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर पोहचली आहे.स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि टर्की या देशांच्या एकूण रुग्णांपेक्षा अमेरिकेतील रुग्ण संख्या अधिक आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये याचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. मात्र, अमेरिकेतील कोरोनाचा वाईट काळ आता संपत आला असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.>काय म्हणाले ट्रम्प?अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, देशात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या कमी झाली आहे. गत आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये ३८ टक्के रुग्ण समोर आले होते. या आठवड्यात ही संख्या कमी होऊन २८ टक्के झाली आहे. एक आठवडा अगोदरच्या तुलनेत न्यूयॉर्कमध्ये नवे रुग्ण ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर, मृत्युमुखी पडणाºयांची संख्याही ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. ट्रम्प म्हणाले की, रुग्णांची संख्या घटत असल्याने अर्ध्या राज्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.>युरोपमधील मृतांची संख्या १ लाख २0 हजारयूरोपमधील कोरोनाच्या मृतांची संख्या १ लाख २० हजार १४० एवढी झाली आहे. यातील बहुतांश मृत्यू इटली, फ्रान्स, स्पेन आणि ब्रिटनमधील आहेत.युरोपात आतापर्यंत कोरोनाचे १३ लाख ४४ हजारांवर रुग्ण समोर आले आहेत. इटली, स्पेन, फ्रान्स या देशाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.दरम्यान, ब्रिटनमधील भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे की, लॉकडाऊन आणि सामाजिक अंतर नियमात सूट देण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या