शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ब्रिटननंतर आता रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 00:52 IST

रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीनदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मॉस्को: जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असून, इटली, स्पेन आणि अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका  बसला आहे. रशियामध्येही कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, आता तिथल्या पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीनदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेनं दिली आहे. रशियामध्ये गुरुवारपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या १००,०००च्या पार गेली आहे.  मृतांचा आकडासुद्धा १०००च्या आसपास आहे. तत्पूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यंदा जानेवारीत रशियाच्या पंतप्रधानपदासाठी निवड झालेल्या मिखाईल यांची कोरोना चाचणी झाली होती, जी गुरुवारी पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत दूरचित्रवाणीवरील प्रसारित व्हिडीओच्या माध्यमातून मिखाईल यांनी ही माहिती दिली आहे. ते सध्या पंतप्रधानपदावरून पायउतार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी आंद्रे बेलूसोव यांना हंगामी पंतप्रधान बनविण्याचा सल्लाही दिला असून, तो पुतिन यांनी मान्य केला आहे. मिखाईल आता कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत.ब्रिटनचे पंतप्रधान देखील होते कोरोनाग्रस्तयापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनसुद्धा कोरोना संक्रमित झाले होते. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, पण उपचारानंतर ते कामावर परतले आहेत. कोरोनानं जगभरात 3,253,612  लोकांना विळख्यात घेतलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या साथीच्या आजारामुळे 230,119 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचं संक्रमण शिगेला पोहोचलं आहे. या भयंकर रोगाचा पराभव करून आतापर्यंत जगभरात 1,023,588 लोक बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या