शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

CoronaVirus News : कोरोनानं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं संकट; 'ही' कंपनी देणार 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 13:51 IST

या आठवड्यात 6,770 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे.

वॉशिंग्टनः कोरोनामुळे जगभरातील विविध क्षेत्रांतील उद्योगांवर संकट आलं आहे. लॉकडाऊन असल्यानं अनेक देशांत उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे लोकांच्या नोकर्‍या मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्या आहेत. आता  बोइंग विमान कंपनीनं 12 हजारांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकत असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतली विमान कंपनी बोईंग यांनी सांगितले की, या आठवड्यात 6,770 अमेरिकन कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त 5,520 कर्मचार्‍यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती अर्थात व्हीआरएसची निवड केली आहे. तसेच कंपनी पुढे आणखी लोकांना नोकरीतून काढून टाकू शकते. बोईंगच्या एकूण कर्मचार्‍यांची संख्या 160,000 च्या आसपास आहे. बोईंग कर्मचार्‍यांच्या एकूण संख्येपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे.  कोरोनामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील ही सर्वात मोठी नोकरकपात असल्याचं मानलं जात आहे. दीर्घकालीन 737 मॅक्स संकटामुळे बोईंगचे आर्थिक गणित अक्षरशः बिघडलेले आहे. त्याचवेळी कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे आणि यामुळे कंपनीचं कंबरडे मोडलं आहे. दोन मोठ्या अपघातांनंतर 737 MAX विमानं एका वर्षापेक्षा जास्त काळापासून जमिनीवर उभी आहेत. कंपनीने 737 विमानांचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे.भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची स्थितीकोरोनामुळे भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रावरही वाईट परिणाम झाला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय विमानन प्रवास ट्रॅव्हल सोसायटीचा (आयएटीए) अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार कोरोनामुळे भारतीय विमान कंपन्यांना यावर्षी 1,122 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 86 हजार कोटी) तोटा होईल आणि 29 लाखांहून अधिक लोक बेरोजगार होऊ शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या