शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: पाकिस्तानच्या क्रूरतेचा कळस; कोरोनाग्रस्तांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 21:55 IST

युनायटेच काश्मीर पिपल्स नॅशनल पक्षाचे अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मीरी यांनी पाकिस्तान सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

इस्लामाबाद : कोरेना व्हायरसमुळे पाकिस्तान एकीकडे जगासमोर दयेची भीक मागत असताना दुसरीकडे त्यांचा घाणेरडा चेहरा उघड झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५०० च्या वर गेली असून या रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यांच्या वास्तव्यासाठी तेथील काश्मीरी लोकांची घरे रिकामी करण्यास जबरदस्ती करण्यात येत आहे. 

युनायटेड काश्मीर पिपल्स नॅशनल पक्षाचे अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मीरी यांनी पाकिस्तान सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त रुग्णांना काश्मीरच्या मीरापूर जिल्ह्यामध्ये पाठविण्यात येत आहे. असे केल्याने पंजाबमधील शहरांना कोरोनापासून वाचविले जाऊ शकते. अशा प्रकारे पाकिस्तान स्वत:ला वाचविण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरला संकटात टाकत असल्याचा आरोप काश्मीरी यांनी केला आहे. 

यामागे पाकिस्तानचे मोठा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आर्थिक मदत मिळविता येईल असा सूप्त हेतू आहे. ही पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्काराचा क्रूरपणा आहे. मीरापूरच्या लोकांनी या त्यांच्या चलाखीला ओळखले असून कोरोनाग्रस्तांना आणण्यास विरोध करत आहेत. 

काश्मीरी यांनी सांगितले की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मीरापूर आणि आजूवाजूच्या लोकांना त्यांची राहती घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनेक कार्यालयीन इमारती आणि हॉस्पिटलही बळजबरीने रिकामे करण्यात येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानPOK - pak occupied kashmirपीओके