शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : वाढत्या अश्लीलतेवर संतापून अल्लाने धाडला कोरोना, पाकिस्तानी मौलवींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 12:53 IST

कोरोना विषाणूच्या रुपात जग अल्लाच्या कोपाचा सामना करत आहे. अल्लाच्या या कोपाचे कारण वाढती अश्लीलता आणि नग्नता हे आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूमुळे पसरलेली साथ हा अल्लाचा शाप जगभरातील वाढती नग्नता आणि अश्लीलतेवर संतापून ईश्वराने ही साथ पाठवलीमौलानांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे

इस्लामाबाद -  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे पसरलेली साथ हा अल्लाचा शाप आहे. जगभरातील वाढती नग्नता आणि अश्लीलतेवर संतापून ईश्वराने ही साथ पाठवली आहे, असा दावा पाकिस्तानातील एका मौलवीने केला आहे. दरम्यान, या मौलवीच्या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. 

मौलाना तारिक जमील या मौलवीने पाकिस्तानच्या राष्ट्रीय टेलिव्हिजनवर पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना पीडितांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या टेलिथॉनदरम्यान हे विधान केले होते. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मौलाना जमील यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या रुपात जग अल्लाच्या कोपाचा सामना करत आहे. अल्लाच्या या कोपाचे कारण वाढती अश्लीलता आणि नग्नता हे आहे. मुलींकडून नृत्य करवून घेतले जात आहे. त्यांचे कपडे कमी होत आहेत. समाजात अश्लीलता सर्वसामान्य बाब झाली आहे, त्यामुळे अल्ला नाराज झाले आहेत. 

दरम्यान, मौलानांच्या या विधानावर सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे विधान महिलांचा अपमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मौलानांचे हे विधान कोरोनाविषयीचे अज्ञान आणि महिलविरोधी मानसिकता दाखवते,  असे शिरीन माजरी यांनी म्हटले आहे. 

जगातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार केल्यास जगभरात आतापर्यंत कोरोनाचे 28 लाख 96 हजार 959 रुग्ण सापडले आहेत. तर 2 लाख 02 हजार 845 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात आतापर्यंत 8 लाख 16 हजार 550 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तान